विश्वास पवार

क्षेत्र महाबळेश्वर परिसरात सर्वत्र गारांचा मोठा पाऊस झाला. गारांचे प्रमाण एवढे होते की, रस्त्यावर जंगलात गारांची चादर पसरली होती. सातारा जिल्हा परिसरातील अनेक गावांमध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. मात्र क्षेत्र महाबळेश्वर येथे झालेल्या जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीसह शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

सातारा जिल्हा परिसरात सध्या अधूनमधून अवकाळी पाऊस सुरू आहे. नुकताच महाबळेश्वर शहरासह परिसरात पावसाने एक ते दीड तास धुवाधार गारांचा पाऊस झाला. परिसरात सर्वत्र गारांचा खच पडला होता. रस्त्यावर, शेतात, जंगली भागात जिकडे बघावे तिकडे पांढरा गारांचा थर दिसून येत होता. या पावसामुळे महाबळेश्वर शहरातून क्षेत्र महाबळेश्वर, ऑर्थर सीट मार्गावर वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती. वाहनचालकांना रस्त्यावरील गारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. अनेक वाहनचालकांनी जोरदार पाऊस, गारांचा वर्षाव यामुळे क्षेत्र महाबळेश्वर, ऑर्थर सीट पाइंट आदी रस्त्यावर आहे त्या ठिकाणी आपली वाहने उभी केली. पाऊस थांबल्यानंतर गारा बाजूला करत रस्ते मोकळे केले व नंतरच वाहतूक संथ गतीने सुरू झाली. महाबळेश्वर येथे दरवर्षी थंडीच्या कडाक्यात हिमनग तयार होत असतात. मात्र या वेळी परिसरात पहिल्यांदाच एवढा मोठा गारांचा पाऊस झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. सातारा जिल्ह््यातील वाई, पाचगणी, पुणे-बंगळूरु महामार्ग, मांढरदेव आदी परिसरांतही हलका व मध्यम दर्जाचा अवकाळी पाऊस.

क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थर सीट पॉइंटपर्यंतच्या रस्त्यावर सर्वत्र बर्फाची सहा इंचाची चादर पसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सर्वत्र रस्त्यांवर लांबपर्यंत बर्फाची चादर पसरल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. अनेक हौशी पर्यटकांनी, लहान मुलांनी या बर्फात मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. रस्त्यांवर लांबपर्यंत पडलेल्या बर्फाचा खच यामुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एकूणच या परिसरातील नागरिकांना हा सर्व प्रकार अनपेक्षित आणि नवा होता.

या पावसाने स्ट्रॉबेरी, फराशी, गहू आदी पिकांचे नुकसान झाले. पर्यटकांनी गारांवरून स्केटिंग केली. गारांचा पाऊस झाल्याच्या ठिकाणी सहा ते आठ इंच गारांची सलग चादर पसरली होती. शेती, रस्ते, जंगली भाग या ठिकाणी सगळीकडे पांढऱ्याशुभ्र गारा पसरलेल्या दिसत होत्या. या पावसात स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाले. शासनाने या स्ट्रॉबेरीचा समावेश फळात केल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेतविमा केला आहे त्यांना त्याची भरपाई मागता येणार आहे.

याबरोबरच जावळी तालुक्यातही आनेवाडी, सायगाव, रायगाव, खर्शीतर्फे कुडाळ, महिगाव, मोरघर येथील परिसरांत वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. शेतशिवारात अजूनही पीककाढणीची लगबग सुरू असल्याने शेतकरी वर्गाची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. सध्या महाबळेश्वरात उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दोन ते तीन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास पडत असलेल्या पावसामुळे येथील पिकांचे नुकसान झाले असले, तरी नागरिकांचा उकाड्यापासून बचाव झाल्याचे चित्र या पावसामुळे पाहायला मिळाले. परिसरामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढल्याने हवेत गर्मीचे प्रमाण होते. जंगलातील वन्यप्राण्यांच्या रहिवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसामुळे येथील उष्णतेचे प्रमाण कमी झाले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. सध्या करोना प्रादुर्भाव असल्याने येथे पर्यटकांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.