शेतकरी आपल्या बलजोडीवर जिवापार प्रेम करतो. परंतु दुष्काळामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता बैल विकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. बैलांच्या आठवडी बाजारात मोठय़ा संख्येने बलजोडय़ा विक्रीला येत आहेत. मात्र, अर्ध्या किमतीत बलांचा कासरा खरेदीदाराच्या हाती देताना मात्र अनेक शेतकऱ्यांना अश्रू आवरत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आठवडी बलबाजार भरतो. मंगळवारी िहगोलीत, तर जवळाबाजार येथे रविवारी बाजार भरतो. बलाची बाजारपेठ सर्वदूर प्रसिद्ध आहे. मंगळवारी िहगोलीत मोठय़ा संख्येने बलांसह इतर पशू विक्रीस आले होते. या बाजारात धान्य, भाजीपाल्यासह विविध वस्तू विक्रीसाठी विक्रेते मोठय़ा प्रमाणात येतात. या बाजारात पशूंच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होते. मात्र, दुष्काळामुळे बाजारात खरीददार नसल्याने अनेकांना बल परत घेऊन जाण्याची वेळ येत आहे. पशूंच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात घट झाली असताना भाकड जनावरांना घेण्यास कोणी तयार नाही. याचे कारण सर्वासमोर चाऱ्याचा प्रश्न असल्याने पशुपालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
मंगळवारच्या बाजारात कैलास िशदे, रामराव काळे, बालाजी िशदे आदी शेतकऱ्यांनी आपल्या बलजोडय़ा विक्रीसाठी आणल्या होत्या. खरेदीदारापेक्षा विक्री करणाऱ्यांची संख्या अधिक होती. शेतकऱ्यांकडे बलास चारा घालण्याइतकाही पसा नसल्याने मुक्या जनावरांची होणारी उपासमार पाहवत नाही, असे सांगताना कैलाश िशदे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सव्वालाखाची बल जोडी ६० हजारांत, तर ५० हजारांची बलजोडी २५ हजारांत विकावी लागली, असे गजानन घुगे, परमेश्वर कोरडे यांनी सांगितले. बालाजी िशदे यांचे ८० हजारांचे बल ४० हजारांत विकण्यात आले.
जिल्ह्यात यंदा कमी पाऊस पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. अनेकांनी मजुरीच्या शोधात इतरत्र स्थलांतर केले. गुढीपाडव्याचे निमित्त साधून शेतकरी सालगडी ठेवतात. दरवर्षी सालगडी शोधून सापडत नाहीत. मात्र, या वर्षी मिळेल त्या किमतीत सालगडी शेतकऱ्यांकडे काम करण्यास तयार आहेत, अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली.
बैलजोडय़ांचा कासरा अर्ध्या किमतीत खरेदीदाराच्या हाती!
शेतकरी आपल्या बलजोडीवर जिवापार प्रेम करतो. परंतु दुष्काळामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता बल विकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
First published on: 26-03-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half rate sale of bull