शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा निगडीतील प्रबोधनकार ठाकरे मैदानात उभारण्यात येणार असून त्याची घोषणा सोमवारी एका सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेत करण्यात आली. बाळासाहेबांच्या जन्मदिनी येत्या २३ जानेवारीपर्यंत पुतळा पूर्ण करण्याचा मानसही या वेळी व्यक्त करण्यात आला.
यमुनानगर येथे झालेल्या सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. तीन तास चाललेल्या सभेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले होते.