राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची कमान ज्यांच्या हातात आहे, त्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव तालुक्यातील पोलीसच भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यांना भीती वाटत आहे, राजकीय संघर्षांत बळी जाण्याची. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून विजयी झालेले भाजप खासदार संजय पाटील आणि तासगावचे आमदार असलेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. या संघर्षांत बळीचा बकरा व्हायला नको म्हणून तासगाव पोलीस ठाण्यातील निम्मे पोलीस बदली घेण्यासाठी धडपडत आहे.
तासगाव तालुक्यातील राजकीय संघर्ष मध्यंतरीच्या दहा वर्षांच्या कालावधीत सुप्तावस्थेत होता. गेल्या दोन वर्षांपासून तासगाव सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून हा संघर्ष पुन्हा उफाळून आला. नेमक्या याच संघर्षांचा लाभ घेत भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आणि मोदी लाटेवर ते निवडूनही आले. मात्र, त्यामुळे आता तासगावामधील आर.आर. विरुद्ध संजयकाका हा संघर्ष तीव्र झाला आहे. या संघर्षांत राजकीय दबाव येण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस ठाण्यातील ३२ पोलिसांनी विनंती बदलीसाठी वरिष्ठांकडे अर्ज केले आहेत. गृहमंत्र्यांच्या गावातच पोलिसांची अशी अवस्था झाली असताना राज्यातील स्थिती नेमकी काय असेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. बदली मागणाऱ्यांमध्ये २० पोलीस कर्मचारी, ८ हवालदार व ४ सहायक पोलीस फौजदारांचा समावेश आहे.
खैरेंची पोलिसांना शिविगाळ ..पान १२
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा