मेघे अभिमत विद्यापीठात कर्करोगावरील अत्याधुनिक संशोधनासाठी केंद्रामार्फ त संशोधन केंद्र उभारण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय खते व रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी दिली.
सावंगीच्या मेघे अभिमत विद्यापीठात ‘आरटीए-रेस्क्यू अ‍ॅन्ड रिव्हाईव्ह’ या सॉफ्टवेअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची दखल घेत अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठातील अस्थिव्यंग विभागाने हे विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध केले आहे. याप्रसंगी एम्सचे अधिष्ठाता डॉ.एन.मे.मेहरा (दिल्ली), मुख्य सल्लागार डॉ.वेदप्रकाश मिश्रा, चंद्रपूरचे डॉ.एम.जे.खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावंगीच्या रुग्णालयाचा गौरव करतांनाच अहिर म्हणाले की, या विद्यापीठात देशविदेशातील विद्यार्थी शिक्षण घेतात. डॉक्टरांनी स्वत:चा विचार न करता देशासाठी योगदान देण्याची मानसिकता ठेवावी. आपली सेवा ग्रामीण व आदिवासी भागासाठी पोहोचवा. नवनिर्मित सॉफ्टवेअर हे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ.संदीप श्रीवास्तव म्हणाले की, हे सॉफ्टवेअर केवळ अपघातातच नव्हे, तर आग लागल्यास किंवा मुलींच्या छेडखानी प्रकरणात सतर्क करणारे आहे.
पोलीस यंत्रणेसोबतही संलग्न करण्यात येणार आहे. प्रत्येक अ‍ॅन्ड्राईड मोबाइलधारकाने हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे, असे आवाहनही डॉ.श्रीवास्तव यांनी के ले. व्यासपीठावर मेघे अभिमत विद्यापीठाचे समन्वयक डॉ.एम.एस. पटेल, डॉ.तनखीवाले, डॉ.ललित वाघमारे, डॉ.आर.सी. गोयल, डॉ.अशोक पखान, डॉ.प्रीती देसाई, प्राचार्य बी.डी. कुळकर्णी यांची उपस्थिती होती. डॉ.नीमा आचार्य यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा