Dhananjay Munde Resignation : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर या प्रकरणात आरोपींना अटक झाली. शिवाय या कटाचा सूत्रधार वाल्मिक कराडलाही अटक झाली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास आहे. त्यामुळे सदर प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता. अखेर ३ मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचं मे २०२४ मधलं एक वक्तव्यही व्हायरल होतं आहे. धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं शरद पवार म्हणाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा