लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जत : प्रत्येक शाळेमध्ये रोज पाहिल्या तासाला सर्व विद्यार्थ्यांना हरिपाठ शिकवण्यात यावा. अशी मागणी नगर दक्षिणचे खासदार निलश लंके यांनी कर्जत येथे बोलताना केली आहे.

जगद्गुरु तुकोबाराय त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा व माऊली मंदिर सहावा वर्धापन दिन या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .माऊली महाराज पठाडे यांच्या पुढाकारातून गुरुवर्य ह भ प बलभीम भाऊ पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली मंदिर येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार निलेश लंके हेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीलंके पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये रोज हरिपाठ म्हणला जावा. ज्यामुळे पुढील काळामध्ये निर्माण होणारी पिढी ही चांगल्या विचाराची तयार होईल आणि सध्या समाजामध्ये ज्या भ्रष्टाचार अत्याचार गुन्हेगारी या घटना घडत आहेत त्याला आळा बसेल. यामुळे शासनाला विनंती आहे की, अशा पद्धतीने पुढची पिढी चांगली घडवण्यासाठी याची अंमलबजावणी करावी.

यावेळी बोलताना राज्याची प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य ह भ प विशाल महाराज खोले यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना सांगितले की, तुकाराम महाराजांची जीवन हे आदर्श असे होते. सर्व समाजाला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी आपला देह जिजवला. सावकार की च्या सर्व वह्या सर्वांना कर्ज माफ करत जाळून टाकल्या . आजच्या काळातील धार्मिकता, राजकारण या सर्व विषय त्यांनी अतिशय विनोदी शैलीमध्ये आणि तेवढ्याच परखडपणे हजारो स्रोते यांच्यासमोर मांडले. पिंगळा हे त्यांचे खास गाणे त्यांनी यावेळी गायले. त्याला सर्वच उत्स्फूर्त भाविकांनी दाद दिली.

सुरेशकाका सराफ या दुकानचे संचालक व संत नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सचिन कुलथे व ओम कुलथे यांच्या हस्ते ह. भ .प. विशाल महाराज खोले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सचिन शेठ कुलथे यांचा सत्कार करण्यात आला. खासदार निलेश लंके यांचा माऊली मंदिर संस्थान यांच्या वतीने राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प माऊली महाराज पठाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.