पुणे म्हणजे सायकलींचे शहर ही ओळख केव्हाच लुप्त झाली. मोपेड, थोडीशी तिरकी करूनच सुरू होणारी स्कूटर असे टप्पे पार करीत पुणे केव्हाच ‘बाईक’स्वार झाले. त्यातही सतत बदल होत गेले. नव्या ‘लुक’च्या ‘रॉयल एनफिल्ड’ हे पुणेरी रस्त्यांवरचे अलीकडील नेत्रसुख. आता त्यातही भर पडणार आहे. पुण्यातल्या वाहनगर्दीत सहा लाखांहून अधिक किंमत असलेली ‘हार्ले डेव्हिडसन’ ही ‘हायफंडू बाईक’ही झळकणार आहे. सध्या पुण्यात अशा दीडशे ‘हार्ले’ आहेत. पण पुणेकरांची एकंदरच बदललेली ‘होऊदे खर्च’ प्रकारची जीवनशैली लक्षात घेऊन या कंपनीने पुण्यातही आपले दालन सुरू केले आहे.
महाराष्ट्रात मुंबई व नवी मुंबईत हार्ले-डेव्हिडसनचे दालन आहे. त्यानंतर हा मान पुण्याला मिळाला आहे. हडपसर-खराडी रस्त्यावरील अॅमोनोरा टाऊन सेंटर मॉलमध्ये शुक्रवारपासून हार्ले डेव्हिडसनचे दालन सुरू झाले. हार्ले-डेव्हिडसनचे देशातील व्यवस्थापकीय संचालक अनुप प्रकाश यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांमध्ये हार्लेचे ग्राहक वाढले आहेत. डिसेंबपर्यंत चार हजार मोटारसायकली रस्त्यावर दिसतील. या दालनात हार्ले डेव्हिडसन रायडिंग गिअर, अॅपरल आदी गोष्टीही उपलब्ध असतील.
११ प्रकारच्या बाईक्स
पुण्यातील दालनामध्ये ११ प्रकारच्या बाईक्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्पोर्टस्टर प्रकारात ‘सुपर लो’(८८३ सीसी), ‘आयर्न ८८३’ (८८३ सीसी), ‘फोर्टी एट’ (१२०२ सीसी) या बाईक्सचा समावेश आहे. डायना प्रकारामध्ये ‘स्ट्रीट बॉब’, ‘सुपर ग्लाईड कस्टम’, ‘फॅट बॉब’ या बाईक्स उपलब्ध आहेत. या गाडय़ा १६९० सीसीच्या आहेत. व्ही रॉडची नाईट रॉड स्पेशल (१२४७ सीसी) आणि टूरिंग प्रकारातील स्ट्रीट ग्लाईड (१६९० सीसी) ही मॉडेल्स आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा