राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं असताना, राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखीच चिघळलं. विरोधकांनी भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संताप व्यक्त करत औरंगाबाद बंदचे आवाहन करत, भाजपावर जोरदार टीका केली आहे.

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

Supriya Sule, Tukaram Maharaj,
सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन, राज्य सरकारवर केली सडकून टीका
Rasta Roko movement of Shivpremi in Kolhapur
कोल्हापुरात शिवप्रेमींचे रास्ता रोको आंदोलन
Provision of 13 crore 40 lakhs for Chhatrapati Sambhaji Maharaj memorial site in Shirala
छत्रपती संभाजी महाराजांच्या शिराळ्यातील स्मृतीस्थळासाठी १३ कोटी ४० लाखाची तरतूद
shivrajyabhishek din 2024 Kolhapur
कोल्हापुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा
Telugu Dsm JDU parties put pressure on BJP over the Union Cabinet department
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
Rohit Pawar Post
“मान झुकवायचीच असेल तर दिल्लीऐवजी रायगडावर…”, रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत
Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala Raigad
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा; किल्ले रायगड सजले, कोल्हापुरातील नवीन राजवाड्यातही सोहळा
BJP management skills support Sandipan Bhumre
छत्रपती संभाजीनगर: भाजपच्या व्यवस्थापन कौशल्याची भुमरे यांना साथ

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद बंदची हाक दिली आहे. तर त्यांच्या आवाहनानंतर कन्नड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. भाजपाला ठोकून काढा अशी टीका हर्षवर्धन जाधवांनी केली आहे. याशिवाय हर्षवर्धन जाधव यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेंदींनाही लक्ष्य केले आहे.

हेही वाचा – “ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही २५ वर्षे निवडून आलात…” ; हर्षवर्धन जाधवांची चंद्रकांत खैरेंवर टीका

फेसबुक लाईव्हमध्ये हर्षवर्धन जाधव म्हणातात, “भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी सांगितलय की, छत्रपती शिवरायांनी पाचवेळा माफी मागितली. त्यांना एक गोष्ट माहीत नाही की, संभाजी महाराजांचे तुकडेतुकडे झाले तरी त्यांनी शरणागती पत्कारली नव्हती आणि हे अशा कुटुंबाला म्हणताय की पाचवेळा माफी मागितली. मग असं म्हणाऱ्यांना छक्के नाहीतर काय म्हणायचं? छत्रपती शिवरायांनी माफी मागितली असं म्हणण्याची हिंमत होतेच कशी?”

याशिवाय “मी फेसबुक लाईव्हद्वारे आवाहन करतोय की दुकाने बंद करा, या भाजपावाल्यांना समजलं पाहिजे की आपण काहीही बरळलो. काय तर म्हणे आमची ईडी, सीबीआयचे पोलीस सगळे आमचं ऐकतात. तुमचं सगळेजण ऐकतील पण महराजांचे मावळे जर संतापले तर काहीही करू शकतात. त्यामुळे मी शिवरायांच्या मावळ्यांना एकच आवाहन करतोय की, जर भाजपावाल्यांच्या थोबाडीत द्यायची असेल तर आपण आपली दुकाने आज बंद ठेवूयात. महाराष्ट्र जर बंद झाला तर यांना समजेल आणि प्रत्येक निवडणुकीत लोक यांना धडा शिकवतील. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नादी लागून छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागितली म्हणण्या इतपत तुमची हिंमत झाली. आमचं जे वाटोळ व्हायचं ते करून घ्यायला आम्ही तयार आहोत, महाराजांचे तुकडे जसे औरंगजेबाने केले तसे तुम्हीही आमचे कराल पण आम्ही तुमच्या शरण नाही यायचो. हे भाजपावाल्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. मी सर्वांना आवाहन करतोय की आज आज संभाजीनगर आणि महाराष्ट्र बंद झाला पाहिजे.” असंही जाधव यांनी यावेळी म्हटलं.