Harshwardhan Patil Meets Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. भाजपाचा एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीसांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, आज हर्षवर्धन पाटील व शरद पवारांची भेट होऊन या भेटीत बराच वेळ चर्चा झाल्यामुळे पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेला आणखी जोर आला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अडीच ते तीन तास चर्चा चालू होती.

दरम्यान, या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही विधानसभा निवडणुकीत तुतारी (शरद पवारांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह) हाती घेणार का? यावर हर्षवर्धन पाटील म्हणाले, “अद्याप महायुतीचा जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मला महायुतीकडूनच तिकीट मिळायला हवं. कार्यकर्ते म्हणत आहेत की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महायुतीकडूनच तिकीट मिळालं पाहिजे. तर काही कार्यकर्ते सुचवत आहेत की महायुतीचं तिकीट मिळालं नाही तर आपण अपक्ष निवडणूक लढवू. तर काही कार्यकर्त्यांची वेगळी मागणी देखील आहे. परंतु, या सगळ्या केवळ कार्यकर्त्यांमधील चर्चा आहेत. याबाबत अद्याप कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी देखील कोणाशी बोललो नाही”.

Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Scammer impersonates CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud : “मीटिंगला जायचंय, ५०० रुपये पाठवा”, स्कॅमरने सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागितले; पुढे काय झालं?
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed in Malvan
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Tanaji Sawant
Tanaji Sawant : “औकातीत राहून बोलायचं”, मंत्री तानाजी सावंतांचा शेतकऱ्यांना दम; म्हणाले, “सुपारी घेऊन मला…”
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर

हे ही वाचा >> Shivaji Maharaj Statue : महायुतीत बेबनाव? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींनी पोस्ट केला शिवरायांचा फोटो, म्हणाले..

हर्षवर्धन पाटील यांना यावेळी विचारण्यात आलं की आज तुमची शरद पवारांबरोबर भेट झाली. दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी तुमच्यात कोणत्या विषयांवर बोलणं झालं? यावर पाटील म्हणाले, “हे खरं आहे की आज आमची एक महत्त्वाची बैठक झाली. मी गव्हर्निंग काऊन्सिलवर आहे. त्यामुळे शरद पवार मला भेटले. बैठकीत आम्ही तीन तास एकत्र होतो. मात्र या बैठकीत केवळ शासकीय विषयांवर चर्चा झाली. इतर कोणतेही राजकीय विषय या बैठकीत घेतले नाहीत”.

हे ही वाचा >> “मीटिंगला जायचंय, ५०० रुपये पाठवा”, स्कॅमरने सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागितले; पुढे काय झालं?

देवेंद्र फडमवीस काय म्हणाले?

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे जातात आणि तिकडचे काही इकडे येतात. मात्र, हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबरच राहतील असा आम्हाला विश्वास आहे”.