Harshwardhan Sapkal Updates : काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर आज हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी भाषणे करत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील यावेळी नेत्यांनी भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra News LIVE Updates : राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

18:29 (IST) 18 Feb 2025

प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया जेव्हा सुरु होती, तेव्हा मला विचारलं की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोण चांगलं राहिल? तेव्हा मी आता व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांनी नावं सांगितली होती. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, सतेच पाटील यांची नावे मी सांगितली होती. मात्र, निवड करत असताना एका व्यक्तीचीच करावी लागते आणि त्यामधून माझी निवड झाली, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.

17:44 (IST) 18 Feb 2025

“दिवस बदलतात, काँग्रेसचे दिवस पुन्हा येतील”, विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

“दिवस बदलतात, काँग्रेसचे दिवस पुन्हा येतील. एवढं बहुमत मिळून देखील महायुतीत एकमेकांचं तोंड न पाहण्याचं काम सुरु आहे. नागपूरवाला एकीकडे तर पुण्यावाला दुसरीकडे आणि ठाणेवाला तिसरीकडे असं सर्व सुरु आहे. त्यामुळे अशा सर्व परिस्थितीत आपल्याला संधी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण काम करू असा विश्वास मी तुम्हाला देतो”, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

17:03 (IST) 18 Feb 2025

“राहुल गांधींना पंतप्रधान पदावर बसवायचंय”, अमित देशमुख यांचं विधान

“महाराष्ट्राला खरंच आज अशा नेतृत्वाची गरज आहे की जो संघटनेला न्याय देऊ शकतो. ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून घडेल. आपल्याला राहुल गांधींना भारताच्या पंतप्रधान पदावर बसवायचं आहे. त्यामुळे आपल्याला आतापासून सुरुवात करावी लागेल”, असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

16:42 (IST) 18 Feb 2025
“महाराष्ट्र हे काँग्रेसच्या विचाराचं राज्य, पुढच्या काळात…”, नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

“काही नेते पळायला लागलेत. पण त्यांना पळू्द्या. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाबरोबर आहे. पुढच्या काळात काँग्रेस पक्ष सत्तेत आणण्यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून काम करु. त्यामुळे कोणत्याही भानगडीत पडू नका. आपण लोकांचं काम करायचं. सर्वच लोक हसतात. मात्र, त्या लोकांची काळजी आपण करायची नाही. पण जेव्हा आपले सर्वात जास्त खासदार आले तेव्हा सत्ताधाऱ्यांना चिंतेचा विषय झाला. महाराष्ट्र हे काँग्रेसच्या विचाराचं राज्य आहे”, असं नाना पटोले म्हणाल आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js
16:22 (IST) 18 Feb 2025

“महाराष्ट्रात ८० ते ८५ आमदार काँग्रेसचे निवडून येतील असा रिपोर्ट होता”,नाना पटोले यांचं विधान

“महाराष्ट्रात लोकसभेत काँग्रेस चांगल्या जागा जिंकल्या आहेत. विधानसभेत देखील आपण जिंकलेल्या आहेत. मात्र, भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आहे. मात्र, लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. ८० ते ८५ आमदार हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील असा रिपोर्ट होता. तसेच भाजपा ५० ते ६० जागा निवडून येईल आणि सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरेल अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण आपल्याला कशा पद्धतीने हारवलं गेलं हे आपण निकालाच्या दिवशी पाहिलं. आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं आहे की जेवढी संख्या तरुणांची नाही त्या पेक्षा जास्त मदतान आलं कुठून? मात्र, निवडणूक आयोग म्हणतं की आमच्याकडे डाटा नाही”, असं म्हणत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

16:12 (IST) 18 Feb 2025

हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद का दिले? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर आज हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 18 Feb 2025

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर आज हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी भाषणे करत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील यावेळी नेत्यांनी भाष्य केलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले सपकाळ विदर्भातील आठवे काँग्रेस नेते, (फोटो-संग्रहित छायाचित्र)