शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अशातच खोट्या प्रतिज्ञापत्रांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली. त्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री व अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. ते रविवारी (१२ नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “झोमॅटो असो, स्विगी असो, आमच्या पक्षात त्या प्रत्येक कामगारांचा विभाग आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून ते प्रतिज्ञापत्र दाखल केले असतील. प्रतिज्ञापत्र खरी आहेत की खोटी हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला पक्षाला नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल.”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे”

“अशाचप्रकारच्या तक्रारी मागीलवेळी शिवसेना प्रकरणातही झाल्या होत्या. त्यावेळी कोल्हापुरात चौकशी पथक आलं होतं. ते पथक याबाबतची चौकशी करून गेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे. पक्षचिन्ह घड्याळ आमचंच राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून पक्ष कुणाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल,” असंही हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं.

“अजित पवार नाटक करणारी व्यक्ती नाही”

हसन मुश्रीफ म्हणाले, “अजित पवार हे तोंडावर बोलणारे व्यक्ती आहेत, ते नाटक करणारी व्यक्ती नाही. त्यांनी आयुष्यात कधीही नाटक केलं नाही. त्यांना खरोखर डेंग्यू झाला होता. आम्ही स्वतः दोन तीन वेळा त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठका घेतल्या. त्यावेळी ते आजारी होते. त्यांच्या प्लेटलेट्स (पेशी) कमी होत होत्या. आता पेशी वाढत आहेत, पण अशक्तपणा आहे.”

हेही वाचा : काळम्मावाडी पाणी योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा – हसन मुश्रीफ

“अजित पवार आत एक आणि बाहेर एक असं करणारे नाहीत”

“अजित पवारांचा आवाज जवळून ऐकला, तर तो आवाज बसलेला होता हे लक्षात येईल. मला वाटतं आता ते व्यवस्थित झालेले असतील. अजित पवारांचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे अजित पवार आत एक आणि बाहेर एक असं करणारे नाहीत. सरळ तोंडावर सांगणारे निर्भिड व्यक्ती आहेत,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.

Story img Loader