Hasan Mushrif : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळही फोडल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्वच नेते, राज्याचा दौरा, मतदारसंघाचा आढावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

महायुती सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा रंगली आहे. “सरकारने इतक्या योजना आणल्या आहेत, आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा”, असं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटलं आहे.

Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Abu Asim Azmi
Abu Azmi : “कोण विरोधक? त्यांनी आम्हाला…”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत? आमदारकीची शपथही घेतली
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

हेही वाचा : Amol Kolhe : “तुम्ही चोरलं घड्याळ तरीही वेळ…”, अमोल कोल्हेंनी अजित पवारांना उद्देशून वाचलेली कविता चर्चेत

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याची योजना सरकारने सुरु ठेवलेली आहे. तसेच प्रत्येक सणाला सहा वस्तु फक्त १०० रुपयांना सरकार देतं. तसंच येणाऱ्या गणपती उत्सवालाही आता चणा डाळ, साखर, रवा, तेल, हे सुद्धा आपण देत आहोत. आता सरकारने येवढ्या मोठ्या योजना आणल्या आहेत. आता घरात जेवण करायला सांगा तेही आम्ही करू, पण मतदानावेळी फक्त महायुतीचं बटणं दाबा”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते रविवारी एका कर्याक्रमात बोलत होते.

जयंत पाटील काय म्हणाले?

हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, “सत्ताधारी काहीही घोषणा करतील. आता आमच्या घरी म्हणजे जनतेच्या घरी जेवण करण्यासाठी येण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे हे किती घाबरलेले आहेत, आता हे किती शरण जायला लागले आहेत. त्यांचं सरकार जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे आता ते जेवण तयार करायला घरी येतो असं म्हणायला लागले आहेत. उद्या अंघोळ घालायलाही येतील”, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर केली.

Story img Loader