Hasan Mushrif : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मोठ्या घेषणा केल्या होत्या. त्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचं वीज बील माफ तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अशा मोठ्या घोषणा केल्या होत्या. यानंतर काही योजना सुरु देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाची आता चर्चा रंगली आहे. आज कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात भाष्य केलं. ‘आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार’, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. दरम्यान, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली. मात्र, त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलं आहे.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

हेही वाचा : महाराष्ट्रातील मद्यप्रेमींवर महसूल वाढवण्याची जबाबदारी! रिकामी तिजोरी भरण्यासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरु आहेत. तसेच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलं.

हसन मुश्रीफांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मी असं म्हटलं की पाच वर्षांचा जाहीरनामा आहे. आर्थिक परिस्थिती पाहून राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे. सतेज पाटील यांनी थोडी कळ काढावी म्हणून मला तसं बोलावं लागलं”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच ते पुढे म्हणाले, “पाच वर्षांसाठी आपला जाहीरनामा असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची परिस्थिती पाहून आम्ही योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल”, असं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दौंड येथील एका कार्यक्रमात आपण कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचं विधान केलं आहे. ते म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान,हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Story img Loader