Hasan Mushrif angry at Uttam Jankar : “मी वेशांतर करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच्या १० बैठकांसाठी दिल्लीला गेलो होतो”, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या दाव्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी शेलक्या शब्दात पवारांवर टीका केली आहे. “देशातील नेतेच वेश बदलून प्रवास करत असतील तर विमानप्रवास किती सुरक्षित आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “एकनाथ शिंदे देखील मौलवीचा वेश धारण करून अमित शाह यांना भेटायला जायचे. त्यामुळे अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, त्यांचे पासपोर्ट जप्त करायला हवेत”, असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटातील नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ म्हणाले, पासपोर्ट जप्त करायला ते काय परदेशात गेले होते का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा