जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते अनेकांना ती गोष्ट आवडते. जात आवडण्याची कारणं वेगवेगळी असतात. घरातली संस्कृती, खाद्यसंस्कृती हे विषय त्यामागे असतात. स्वतःच्या जातीवर अभिमान, आपलेपणा असणं हे महाराष्ट्रात होतं. १९९९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे महाराष्ट्रात सुरु झालं असा आरोप राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…तर महाराष्ट्राचा बिहार होईल

महाराष्ट्रात जर अशीच जातीय तेढ वाढायला लागली तर आपलाही बिहार किंवा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. याबाबत मी माझ्या भाषणातही बोललो होतो. या नेत्यांच्या निवडणून येण्याच्या स्वार्थी राजकारणापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतो आहोत. ज्या महाराष्ट्राचं उदाहरण देशभरात दिलं जातं त्या महाराष्ट्रात या गोष्टी सुरु आहेत. संत परंपरा किंवा इतर विचार असतील, सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर होता आणि राहील मात्र महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत हे दुर्दैवी आहे.

माझ्या पक्षात जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही

माझ्या पक्षात मी कुठल्याही जाती-पातीच्या राजकारणाला थारा दिलेला नाही देणार नाही. जर मला असं प्रकार कळलं तर मी त्या व्यक्तीला दूर करेन असंही राज ठाकरे म्हणाले. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे. जर चांगल्या क्षमतेचा माणूस असेल तर तो कुठल्या जातीचा आहे हे मी बघत नाही. जातपात मी मानत नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना जातीच्या राजकारणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष वाढला असं म्हटलं आहे.

भाजपावरही टीका

मी माझ्या भाषणात मागेही बोललो होतो की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही. जगात अनेक अशी उदाहरणं आहेत. ५६ ते ५८ वर्षे काँग्रेसने राज्य केलं आहे देशावर. आपण कधी विचार केला होता का की ५५ खासदारांवर हा पक्ष येईल? असं कुणाला तरी वाटलं होतं का? सगळ्या गोष्टींचं उत्तर काळ असतो तो उत्तर देत असतो असं राज ठाकरे म्हणाले.