राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन विविध मुद्य्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. याच वेळी वक्फ बोर्डावरील नियुक्त सदस्याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कसे संबंध आहेत, हे देखील फडणवीसांनी निदर्शनास आणून दिलं. तसेच, या सदस्याची नियुक्ती राज्य सरकारमधील अल्पसंख्याकमंत्री असलेल्या नवाब मलिकांकडून झाली असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. विशेष फडणवीसांनी दाऊदशी संबधित एक खळबळजनक संवादाचा पेनड्राईव्ह देखील विधानसभेत सादर केला आणि तो संवाद देखील उपस्थिती सर्वांना वाचून दाखवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्र आहेत. त्यापैकी एक आहे मोहम्मद अरशद खान आणि दुसरे म्हणजे ज्यांना तुमच्या सरकारमधील अल्पसंख्याकमंत्र्यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं आहे असे डॉ. मुद्दसीर लांबे. ३१ डिसेंबर २०२० रोजी डॉ.लांबे यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्या असं म्हणतात, की जेव्हा तक्रार करण्याचा इशारा दिला तेव्हा डॉ. लांबे यांनी लग्न करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. यानंतर त्या महिलने तक्रार दिली. २८ जानेवारी २०२० रोजी ही घटना घडली आणि लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर २०२० पर्यंत त्यांनी पोलीस तक्रार करण्याची वाट पाहीली, असं त्यांनी म्हटलंय. ही घटना घडल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला असंही म्हटलं आहे. या महिलने आत्महत्या करण्याच इशारा दिला त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. आता बलात्काराची तक्रार होऊन देखील डॉ. लांबे बाहेर आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. परंतु डॉ. लांबे यांनी या महिलेच्या पती विरुद्ध चोरीची तक्रार केली आणि तो आता अटकेत आहे. २८ जानेवारी २०२२ रोजी ही तक्रार शीळ नायगर पोलीस स्टेशन ठाणे, या ठिकाणी झाली या सगळ्यांची प्रती माझ्याकडे आहेत.”
वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. लांबे आणि अरशद खानचं संभाषण –
तसेच, “वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले डॉ. लांबे हे आपला विसृत परिचय देत असल्याचा ऑडिओ या पेनड्राईव्हमध्ये देखील आहे. डॉ. लांबे यांचा मोहम्मद अरशद खानशी झालेला संवाद त्यामध्ये आहे. परिचया व्यतिरिक्त वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याची विस्तृत उल्लेख त्यामध्ये आहे.” असंही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात सांगितलं. पुढे फडणवीस म्हणाले, “यामध्ये डॉ. लांबे म्हणतात माझे सासरे दाऊदचे राईट हॅण्ड आहेत आणि माझं लग्न हे हसीना आपा ने जमवलं होतं. हसीना आपा म्हणजे दाऊची बहीण आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी म्हणजे दाऊची वहिणी. जरा देखील काही झालं तर गोष्ट तिथपर्यंत पोहचते, कराचीपर्यंत.” असं आपल्या वक्फ बोर्डाचे सदस्य सांगत आहेत. असं फडणीस यांनी विधानसभेत बोलून दाखवलं.
याचबरोबर, “यावर अरशद खान डॉ. लांबे यांना सांगतो की तुम्ही अन्वरचं नाव तर ऐकलं असेलच, ते माझे काका आहेत. ते देखील त्याच्यासोबतच राहत होते. म्हणजे सुरुवातीला राहत होते आता त्यांचे निधन झाले. डॉ. लांबे म्हणतात माझे सासरे पूर्ण कोकण बेल्ट सांभाळतात. अरशद खान म्हणतो मुंबईत माझे काका होते आणि सगळं पाहत होते. यावर लांबे म्हणतात अरशद तू आता वक्फचं काम पाहा, कारण आपल्याकडे सत्ता आहे आता तू हवा तेवढा पैसा कमवू शकतोस. सगळी वक्फची कामं सुरू कर कमाईचं गणित बसव, तुझा अर्धा हिस्सा माझा अर्धा हिस्सा.” असा पुढील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवला.
मी संपूर्ण संवाद दिलेला आहे, त्यामुळे मोबाईलमधून डिलीट झाला तरी अडचण नाही –
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, “आता अरशद खान सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे मोबाईल देखील त्यांच्या ताब्यात आहे. आता विनंती एवढीच आहे. हे मांडल्याबरोबर डिलीट होऊ देऊ नका, लगेच कळवा. मी संपूर्ण संवाद दिलेला आहे, त्यामुळे डिलीट झाला तरी अडचण नाही, परंतु कळवा आणि तो मोबाईल जप्त करा. मला एवढच सांगायचं आहे. चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डात नियुक्त केली आहेत का?” असं म्हणत महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला.
तर या महाराष्ट्रात कुणाचच भलं होऊ शकत नाही –
तसेच, “खरं म्हणजे या अर्थसंक्लापवर बोलत असताना, एकीकडे सरकार चार गोष्टी कमी करेल, चार जास्त करेल ते आपण पाहून घेऊ. एखाद्या वर्षात विकास कमी होईल जास्त होईल ते देखील चालण्यासारखं आहे. पण या राज्यात ज्याने बॉम्बस्फोट घडवले, अशा दाऊदसोबत ज्यांचे संबंध आहेत अशा लोकाना जर सरकार पाठीशी घालत असेल, तर या महाराष्ट्रात कुणाचच भलं होऊ शकत नाही. त्यामुळे आता तरी जागं व्हा एवढीच विनंती करतो.” असं म्हणत फडणवीसांनी आपलं बोलणं संपवलं.