ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर (मुंबई), स्वाभिमानी संघटना तथा महायुतीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी (हातकणंगले) आणि सदाभाऊ खोत (माढा) या तिघांना पाठिंबा जाहीर केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे पदाधिकारी श्याम आसावा यांनी ही माहिती दिली. हजारे यांनी आज ही घोषणा केली. हजारे यांनी या तिघांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांना व्यक्तिगत पातळीवर या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्याच्याशी त्यांच्या पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे आसावा यांनी सांगितले.

Story img Loader