सांगली : पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील हजारो हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मिरजेतील खॉजा शमना मिरासाहेब ऊरुसाला सोमवारी सुरुवात झाली. चर्मकार समाजाच्या मानाचा गलेफ सुर्योदयापुर्वी मिरवणुकीने अर्पण करण्यात आला.मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा यंदाचा ६४९ वा उरुस आहे. ऊरुसाचा प्रारंभ चर्मकार समाजाच्या मानाचा गलेफाने होते.
हेही वाचा >>> मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांवर दगडफेक
आज पहाटे परंपरे प्रमाणे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात चर्मकार समाजाच्यावतीने मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला. यासाठी देशातून राज्यातून चर्मकार बांधवांसह इतर धर्मीय लोक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरजेतील सातपुते वाडा येथून गलेफ मिरलणुकीची सुरुवात झाली. पार कट्टा, महादेव मंदिर, मंडई रोड, नगार खाना कमानीतून प्रवेश करून सकाळी सूर्योदयापूर्वी गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी पारंपारिक वाद्याबरोबर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
हेही वाचा >>> १६ नोव्हेंबरला राजीनामा का दिला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, “कमरेत लाथा घालण्याची भाषा..”
यावेळी सातपुते वाड्यातील बाबूलाल सातपुते, श्रीकांत सातपुते, दत्तात्रय सातपुते, शरद सातपुते, विशाल सातपुते यांच्यासह माजी स्थायी सभापतीबसवेश्वर सातपुते, तानाजी सातपुते, माजी उपमहापौर आनंदा देवमाने आदी समाजबांधव उपस्थित होते.यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी, डॉ. महादेव कुरणे, अतहर नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, संगीतरत्न अब्दुल करीम खॉसाहेब यांच्या ९० व्या स्मृत्यर्थ दर्गा परिसरात तीन दिवस संगीत सभा मंगळवारपासून सुरु होत आहे. या सभेत देशभरातील दिग्गज कलाकार आपली संगीत कला सादर करणार आहेत.