राज्यात नद्यांकाठी बांधकाम करण्यासाठी परवानगी देताना सरकारकडून नक्की कोणत्या धोरणांचा अवलंब केला जातो, याविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले. या आदेशानुसार नदी, खाडी आणि तळ्यांकाठी करण्यात येणाऱ्या बांधकामांबाबतच्या धोरणाचा अहवाल आगामी तीन आठवड्यांत राज्य सरकारला न्यायालयापुढे सादर करण्यास सांगण्यात आले. व्ही.एम.कानडे आणि पी.डी. कोदे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला याबाबतचे आदेश दिले. तसेच नदी आणि खाडीच्या पुरक्षेत्राच्या कक्षेत बांधकाम करताना सरकार नक्की कोणत्या नियमांखाली परवानगी देते याबाबतसुद्धा न्यायालयाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
नदीकाठावरील बांधकामाचे धोरण जाहीर करा- उच्च न्यायालय
राज्यात नद्यांकाठी बांधकाम करण्यासाठी परवानगी देताना सरकारकडून नक्की कोणत्या धोरणांचा अवलंब केला जातो, याविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले.
First published on: 05-07-2014 at 02:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hc directs maha to declare its river policy