शाळेतील सहकारी शिक्षिकेस अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या शिरूरकासार तालुक्यातील फुलसांगवी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकास मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी निलंबित केले. निलंबनाच्या कालावधीत परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजेरी लावण्याचे सूचित केले आहे.
मुख्याध्यापक जािलदर प्रल्हाद सोनवणे याने शाळेतीलच सहकारी शिक्षिकेस भ्रमणध्वनीवरून अश्लील संदेश पाठवून त्रास दिला होता. या प्रकरणी २६ एप्रिलला सोनवणेविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, मुख्याध्यापकाने या गुन्ह्य़ाची माहिती शिक्षण विभागापासून लपवून ठेवली. या प्रकरणी गुरुवारी सोनवणे यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ‘सीईओ’ जवळेकर यांनी हा आदेश निर्गमित केला. निलंबन कालावधीत गटशिक्षण अधिकारी कार्यालय, परळी हे मुख्यालय देण्यात आले असून गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सोनवणे यास मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Headmaster suspended in issue in give harassment to lady teacher