अलिबाग- खाजगी रुग्णालयाकंडून रुग्णसेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या मनमानी शुल्क आकारणीला लवकरच चाप बसणार आहे. राज्यात बॉम्बे नर्सिंग अँक्टच्या कठोर अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाच्या नविन इमारतीच्या भूमिपूजन समारंभानंतर बोलत होते. खाजगी रुग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यात सुधारणा झाली नाही. तर आरोग्य विभागाकडून पुढील सहा महिन्यात कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत खाजगी रूग्णालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात अनेक त्रृटी दिसून आल्या. या रुग्णालयांना त्या त्रृटी दूर करण्यासाठी आम्ही वेळ दिला आहे. सहा महिन्यात त्यात सुधारणा झाली नाही. तर बॉम्बे नर्सिंग अँक्ट मधील तरतूदींनुसार नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला. खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवांबाबत दरपत्रक लावणे बंधनकारक असून पैश्यासाठी रुग्णांची अडवणूक करणे, अवाजवी दर आकारणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सिटी स्कॅन एमआरआय सुविधांसाठी रुग्णांना चार चार महिने वाट पहावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. विधीमंडळाच्या सभागृहातही या प्रश्नाकडे आज लक्ष्यवेधण्यात आले होते. मात्र राज्यातील शासकीय रुग्णालये, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेली रुग्णालये आणि महानगर पालिकांच्या रुग्णालयात सिटी स्कॅन आणि एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.  खाजगी सरकारी भागीदारीतून तसेच सरकारच्या माध्यमातून मुंबई सह ग्रामिण भागातील ही आम्ही या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे दोन महिन्यात यात सुधारणा झाल्याचे दिसून येईल असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

बुलढाण्याच्या केस गळतीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अभ्यास सुरू आहे. त्यांच्या अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक बोलता येईल, मात्र भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी पाऊले उचलली जातील. रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत दीड वर्षात पूर्ण होईल. अतिशय देखणी इमारत या ठिकाणी उभारण्यात येणार असून, त्यातून ग्रामिण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जातील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.