राज्यात येत्या १५ ऑगस्टपासून रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेचं स्वरूप कसं असेल, याविषयी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये मुंबईतील लोकल प्रवास, हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे, मॉल्स, मंगल कार्यालये यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यासोबतच राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी देखील राजेश टोपे यांनी माहिती दिली. तिसऱ्या लाटेदरम्यान परिस्थिती अधिक बिघडल्यास संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाउन लागू करण्यासंदर्भात राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेदरम्यान, परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल, हे स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात ३८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल

राजेश टोपे यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या परिस्थितीवर लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं यावेळी नमूद केलं. “तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एकूण उत्पादित होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे. औद्योगिक क्षेत्राने अजून २०० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवण्याची खात्री दिली आहे. त्याप्रमाणे त्यांनी वाढ देखील केली आहे. राज्यात एकूण ४५० पीएसए प्लांट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी १४१ प्लांट्समध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही सर्व क्षमता जरी वापरली, तरी १७०० ते २००० मेट्रिक टनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्रानं सांगितलंय की दुसऱ्या लाटेचा पीक होता, त्याच्या दीडपटीची व्यवस्था करून ठेवा. त्यामुळे ३८०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे”, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.

ज्या दिवशी राज्यात…

“ऑक्सिजनच्या अशा परिस्थितीमुळे असा निर्णय घेण्यात आला आहे, की तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी राज्यात ७०० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात ऑटो मोडवर कठोर लॉकडाऊन लागू करण्यात येईल. इतर राज्यात देखील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे केंद्राकडून वेळेवर किती मदत मिळू शकेल, हे सांगता येणं शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात आपण हा निर्णय घेतला आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

१५ ऑगस्टपासून निर्बंधांमध्ये शिथिलता

राज्य मंत्रिमंडळात घेतलेल्या इतर निर्णयांमध्ये कोणत्या संदर्भात शिथिलता देण्यात आली आहे त्याची माहिती देण्यात आली. राज्यात रुग्णसंख्येचा दर कमी असणाऱ्या ठिकाणी ही शिथिलता देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाली. त्यानुसार, उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये ५० टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा १०० या पेक्षा जास्त नाही.

‘या’ निर्बंधांमध्ये असेल शिथिलता; वाचा सविस्तर

शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे आणि असंही सांगितलं आहे की, खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जी खासगी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी २४ तास खासगी कार्यालयं सुरू राहू शकतील, हा एक महत्वपूर्ण निर्णय़ आहे. कारण एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात २५ टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालयं सुरू ठेवता येतील, अशी सूचना करण्यात आलेली आहे.