ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर वरळीतून माझ्याविरोधात लढा, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले. आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंत पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, शिंदे गटातील नेते तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. राज्यात चार वेड्याचे रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांत जागा असेल तर मी त्यांना रुग्णालयात पाठवण्यास तयार आहे, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत. ते आज (१० फेब्रुवारी) सोलापुरात माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून मोदींची महादेवाशी तुलना; म्हणाले “जगातील…”

Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू

“सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ली मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू,” असे तानाजी सावंत म्हणाले.

हेही वाचा >>> गौतम अदाणी प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले; “मुंबईत येत असाल तर…”

मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले

याआधी तानाजी सावंत सोलापूरमधील गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मीच फाऊंडर आहे, असा दावा केला. “२०१९ साली मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते. माझ्यावर अन्याय का करण्यात आला, याचे मला उत्तर द्या, असा जाब मी मातोश्रीवर जाऊन विचारला होता. तसेच माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नसाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, असेही मी तेव्हा म्हणालो होतो,” असे तानाजी सावंत म्हणाले.

Story img Loader