Reason behind sudden hair loss in Buldhana Shegaon villages : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सहा गावात जवळपास ५० पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केसगळतीचा त्रास होऊ लागला. अगदी काही दिवसातच त्यांचे टक्कल पडत आल्याने सगळीकडे याचीच चर्चा सुरू झाली. एकाचवेळी अनेकांना हा त्रास होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान आज या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि केसगळतीच्या संभाव्य कारणांबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केसगळतीचे कारण काय?

“काल आमच्या निदर्शनास आले की पाच ते सहा गावांमध्ये केसगळतीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही तपासणी केली. त्वचा रोगांचे तज्ज्ञ आमच्याबरोबर होते.त्यांचं क्लिनीकल डायग्नोसीस असं आहे की, त्यांना (रुग्णांना) डोक्याच्या त्वचेचे फंगल इन्फेक्शन झाले आहे. आम्ही त्या त्वचेचे नमूनेही घेतले आहेत आणि ते अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याची हिस्टोपॅथॉलॉजी तपासणी करण्यासाठी पाठवले आहेत. त्यामधून निष्कर्ष नक्कीच निघेल. पण सध्या क्लिनीकल निष्कर्षहा आहे की हे फंगल इन्फेक्शन आहे आणि त्यानुसार आपण रुग्णांवर उपचारही सुरू केले आहेत”.

दूषित पाण्यामुळे केस गळत आहेत का?

गावामधील पाणी दूषित झाल्याने नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे, याबद्दल विचारले असता गिते म्हणाले की, “दूषित पाणी असतं तर संपूर्ण गावाला हा त्रास झाला असता. संपूर्ण गावाला हा त्रास नाही. पाण्याचा नक्की काहीतरी परिणाम असेल. पण पाण्यामुळे इन्फेक्शन वाढतंय असं म्हणणं योग्य ठरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा>> Crime News : धक्कादायक! पैशांच्या बदल्यात मित्रांना पत्नीवर करू दिला बलात्कार… सौदीत बसून पाहायचा व्हिडीओ; गुन्हा दाखल

“पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले आहेत, त्यामधून काय समोर येतं यावर देखील पुढील कारवाई काय असेल हे ठरेल”, असेही डॉक्टर अमोल गीते म्हणाले.

फंगल इन्फेक्शन ठराविक भागातच का होत आहे, याचा तपास आपण करत आहोत. कालपर्यंत ५१ रुग्ण होते. रुग्णांची संख्या कमी होत असून ती वाढत नाही असेही त्यांनी सांगितले. ज्या लोकांचे केस गेले होते ते पण परत उगवण्यास सुरूवात झाले असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असेही गीते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा>> टीएमसी, सपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही सोडला काँग्रेसचा हात… दिल्ली निवडणुकीत ‘आप’ला …

दरम्यान केसगळतीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करून अहवालासाठी पाठवण्यात आले होते. आज या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली. गीतेंनी सांगितलं की, प्राथमिक तपासणी केल्यानंतर बाधित गाव परिसरातील पट्टा हा खारपणपट्ट्यात येतो तेथे पाण्यातील नायत्रेटचं प्रमाण जास्त आहे. साधारणतः पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण १० टक्के असायला पाहिजे मात्र या गावांमध्ये ते ५४ टक्के आहे. त्यामुळे या भागातील पाणीच घातकच असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आरसेनिक व लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाणी नमुने पाठवल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली आहे.