आरोग्य विद्यापीठाने गुणवत्ता सांभाळून पुनर्मूल्यांकन संदर्भात विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाबाहेर पुनर्मूल्यांकनाच्या नियमात बदल करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची सोमवारी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर व इतर अधिकाऱ्यांसमवेत भुजबळ यांनी चर्चा केली.
या वेळी प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर, परीक्षा नियंत्रक डॉ. के. डी. गर्कळ, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संदीप गुंडरे आदींसह विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व पालक उपस्थित होते.
पुनर्मूल्यांकनाची पद्धत सुरू ठेवण्याची मागणी तसेच उत्तीर्ण होण्यासाठी असलेली ५० टक्के गुणांची मर्यादा पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे उन्हाळी २०१३ सत्रातील परीक्षेपासून रद्द करावी आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करताना कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या असून, विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारी दुहेरी मूल्यांकनाची पद्धत योग्य असल्याचा निर्वाळा दिला असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मागणी न करताच दुहेरी मूल्यांकनाचा लाभ होत असल्याने कोणावरही अन्याय होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा