राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना ह्दयविकाराचा झटका आला असून, त्यांना भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल आहे. दरम्यान, आाता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
कात्रज येथे कात्रज दूध संघाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पवारांविषयींच्या आठवणींना उजाळा देताना वळसे पाटील यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांनतर त्यांना तात्काळ जवळच्या भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.
आणखी वाचा