पाचगणी परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावासमुळे परिसरातील जमिनीला भेगा आणि घरांना तडे जाण्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील रूईघर (ता.जावली) या गावाची गणेशपेठ ही वस्ती पाचगणीपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसली आहे. या परिसरात जमिनीला मोठय़ा भेगा पडल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे. या वस्तीतीलच दोन घरांना तडे जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. एका घराची सुरक्षाभिंत अन्य घरावर पडल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. तडे गेलेल्या या घरातील रहिवाशांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. दुसरीकडे पाचगणीहून कुडाळकडे जाणाऱ्या घाट रस्त्यालाही मोठे तडे गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धेाकादायक बनला आहे.
दरम्यान, जमिनीला पडलेल्या भेगा, घरांना गेलेले तडे आणि खचलेला घाटमार्ग या साऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महाबळेश्वरसह पाचगणी परिसरात गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळत असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी वृक्ष पाडण्याचे प्रकार घडले आहेत. आज सकाळपर्यंत पाचगणी शहरात ३९ मीमी पाऊस पडला असून आजअखेर ११५९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीने पाचगणीत घरे, जमिनींना तडे
पाचगणी परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावासमुळे परिसरातील जमिनीला भेगा आणि घरांना तडे जाण्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील रूईघर (ता.जावली) या गावाची गणेशपेठ ही वस्ती पाचगणीपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसली आहे.
First published on: 02-08-2013 at 04:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain damage house in panchgani