दिवसभराच्या तीव्र उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी मिरजेत पावसाने दमदार हजेरी लावली. अर्ध्या तासाहून जास्त वेळ सुरु असलेल्या पावसाने मिरजेत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे बाजारकऱ्याबरोबर भाजी व पदपथावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
हेही वाचा >>> पनवेलमध्ये १०२ वर्षांपासून तालवाद्यांची हाताने निर्मिती करणारे ‘पुणेकर’
यंदाच्या हंगामात पश्चिमेकडील शिराळा वगळता सर्वच जिल्ह्यात पावसाची तूट असून सरासरीच्या २५ टक्केच पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात नोंदला असून खरीपाची पेरणी पेरणी केवळ ५८ टक्के झाली. मात्र शिराळा, वाळवा वगळता अन्य तालुक्यातील पिके पावसाअभावी करपली आहेत.
हेही वाचा >>> ‘गोकुळ’ बाबत शौमिका महाडिक दूध उत्पादकांची दिशाभूल करत आहेत – अरुण डोंगळे
आज दिवसभर ३० अंश सेल्सियस तपमान होते. सायंकाळी अचानक ढगांची आकाशात गर्दी होऊन मिरजेत जोरदार पाऊस झाला. सांगलीला मात्र पावसाने हुलकावणी दिली. मिरजेत झालेल्या पावसाने तांदुळ मार्केट, स्टेशन रस्ता, शनिवार पेठ रस्त्यावर दीड फुटांनी पाणी वाहत होते. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम सुरु असल्याने बाजूचे जोडरस्ते जलमय झाले होते. फोटो- मिरजेतील तांदुळ मार्केटमधील रस्त्यावर पावसाचे पाणी.