हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत जिल्ह्य़ात शनिवारी रात्रीपासून पावसाने संततधार धरली असून २४ तासांत एकूण सरासरी ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद (१६८ मिमी) झाली असून गुहागर (१३३.४ मिमी), लांजा (१२६.२ मिमी), रत्नागिरी (१२४.२ मिमी), चिपळूण (१२३.२ मिमी), संगमेश्वर (११५.५ मिमी) आणि मंडणगड (११२ मिमी) या तालुक्यांमध्येही पावसाच्या मोठय़ा
सरी पडल्या. रत्नागिरीजवळ वरवडे येथे एका मच्छीमार नौकेला जलसमाधी मिळाली. मात्र
त्यावरील सर्व खलाशांना वाचवण्यात यश आले .

Story img Loader