वाई: साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी, कास पठार परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाबळेश्वर, तापोळा लामज, किल्ले प्रतापगड ,कांदाटी खोऱ्यात आणि जोर(ता वाई) येथील पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वहात आहेत. आंबेनळी घाटात रात्री दोन ठिकाणी दरड कोसळली. रात्री चिरेखिंडी तर सकाळी दबिल टोक या ठिकाणी दरड कोसळली. यामुळे महाबळेश्वर पोलादपूर वाहतूक ठप्प झाली आहे. पोलादपूर नजीक ठिकठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्प आहे.

बुधवारी सकाळी महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी साठल्याने वाहतूक संथ आहे. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर लिंगमळा परिसर देखील जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून शहर व परिसरात पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसात आजही जोरदार वाऱ्यासह पावसाने अक्षरश: झोडपून काढले

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

मागील चोवीस तासात जोर ३११ मिमी महाबळेश्वर येथे २७६.५ मिमी तासात पावसाची नोंद नोंद करण्यात आली. दरम्यान संततधार पावसाने बुधवारी वेण्णालेक महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर ठिकठिकणी जलमय रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

वाई तालुक्यातील जोर जांभळी परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धोम बलकवडी धरण २.६९ टीएमसी ६९. ७३६ टक्के भरले आहे. धोम धरण ५.४४ टीएमसी ४०.२९ टक्के पाणी साठ्यात वाढ झाली आहे. वेण्णा नदीला पूर आला आहे. सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहेत.रस्त्यावर पाणी साठले आहे.पुणे बंगळूर महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरु आहे.पावसाने ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) पावसामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कास पठार परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील धबधबे ओसंडून वाहत आहेत. अद्याप पर्यंत पावसाने पडझडीची अथवा रस्ते पूल साकव वाहून गेल्याची माहिती मिळालेली नाही.

Story img Loader