कराड : पश्चिम घाट क्षेत्रात सुमारे २५ दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असून, कोयना धरणाच्या पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. तर, अन्यत्र, पावसाची रिपरिप दिसते आहे.शुक्रवारी दिवसभरात कोयना धरणक्षेत्रातील पाथरपुंजला सर्वाधिक १०५ मि. मी. तर नवजाला १०३, प्रतापगडला ८४, कोयनानगरला ७७, महाबळेश्वरला ७१ मि. मि. पाऊस झाला आहे. जोर येथे ६९, गजापुरला ४०, कटी येथे ३७, कासला ३१, ठोसेघरला १९, दुधगंगा ११, तारळी व धोम ८, वारणा ६, धोम-बलकवडी १७ मि. मी. असा पाऊस झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाचे पहिले सत्र कोरडे गेल्यानंतर झालेल्या दमदार पर्जन्यवृष्टीने खरीपाचा पेरा उशिरा का होईना शेतकऱ्यांनी उत्साहात पूर्ण केला. परंतु, हातघाईने झालेल्या या पेरण्यांना पावसाच्या सलग दीर्घ उघडपीचा फटका बसला. पिकांची उगवण जोम धरण्यासाठी लागणारा पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके जळाली. उगवण कोमेजू व माना टाकू लागल्याने दुष्काळाची भीती व्यक्त होत असतानाच पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याचे चित्र आहे असे असलेतरी खरीपाचे उत्पन्न घटून त्याचे दर मात्र, गगनाला भिडणार आहेत.