रायगड जिल्ह्य़ाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. जिल्ह्य़ात सरासरी ११८.४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रोहा, पेण, पनवेल आणि माथेरान शहरांना पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ातील काळ, सावित्री, गांधारी, कुंडलिका, आंबा आणि पाताळगंगा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ११८.४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग तालुक्यात ८९ मिमी, पेण तालुक्यात १५३ मिमी, मुरुड तालुक्यात ११६ मिमी, पनवेल तालुक्यात १५४ मिमी, उरण तालुक्यात ६८ मिमी, कर्जत तालुक्यात १३५ मिमी, खालापूर ९३ मिमी, माणगाव १३४ मिमी, रोहा  १७० मिमी, पाली ८० मिमी, तळा १२० मिमी, महाड १२६ मिमी, पोलादपूर ११५ मिमी, म्हसळा १०४, श्रीवर्धन तालुक्यात ९३ मिमी, तर माथेरान येथे १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणात काही ठिकणी मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा