अवघ्या चार तासात २८१ मि.मी.च्या वर मुसळधार पाऊस कोसळल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. गेल्या २५ वर्षांत शहरात असा पाऊस पडला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने हजारो लोक अडकून पडले आहेत. दरम्यान, जिल्ह्य़ात जोरदार पाऊस सुरूच असून भिवकुंड नाल्यावर एका ऑटोरिक्षातील सहा जण वाहून गेले. यातील चौघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले असून रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याने हजारो प्रवासी गाडय़ांमध्ये अडकून पडले आहेत. इरई धरणाचे सर्व दरवाजे आज एक मीटरने उघडण्यात आल्याने अनेक भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रविवार सुरू झालेल्या मुसळधार पावसाने काल गुरुवारी विश्रांती घेतल्यानंतर आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर १२ वाजतापासून अभूतपूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी चापर्यंत सलग कोसळतच होता.
गेल्या २५ वर्षांत इतका मुसळधार पाऊस कधीच झाला नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याने मनपाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी पावसाळ्यापूर्वी योग्य पध्दतीने कामे न झाल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याची ओरड लोक करत आहेत. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड नाल्याजवळ एक ऑटोरिक्षा सहा प्रवाशांसह वाहून गेला.
यातील चौघांना वाचविण्यात यश आले असून एका अनोळखी मुलीचा यात मृत्यू झाला. या मुलींच्या वडिलांचा शोध बल्लारपूर पोलिस घेत असल्याची माहिती ठाणेदार पंजाबराव मडावी यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
चंद्रपुरात पावसाचे थैमान
अवघ्या चार तासात २८१ मि.मी.च्या वर मुसळधार पाऊस कोसळल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे. गेल्या २५ वर्षांत शहरात असा पाऊस पडला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने हजारो लोक अडकून पडले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-07-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain rampages chandrapur