शहराला आज, गुरुवारी सायंकाळी पुन्हा जोरदार वादळाने तडाखा दिला. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले, मात्र कोणतीही मोठी हानी झालेली नाही. सुमारे तासभर सुरू असलेल्या वादळी वा-याने शहरात चांगलीच घबराट उडवून दिली. एमआयडीसी ते सावेडी या पट्टय़ात पाऊसही झाला.
दिवसभर नगरकर उकाडय़ाने हैराण होते. वीजकपातीने त्यात भरच टाकली आहे. सायंकाळी सहानंतर दाटलेल्या ढगांनी अंधाराचे वातावरण निर्माण केले. जोरदार पावसाची अपेक्षा होती. काही वेळातच प्रचंड वेगाने वाहणा-या वा-याचा तडाखा शहराला बसला. सुमारे तासभर वारे वाहात होते. शहरात काही ठिकाणी घरावरील, शेडवरील पत्रे उडाली. घराच्या खिडक्या, दारेही वा-याने जोरदार आपटत होती. धुळीचे लोटही वाहात होते, त्यामुळे चालकांना वाहने चालवणे अवघड झाले होते.
एमआयडीसी ते सावेडी दरम्यान सायंकाळी पावसास सुरुवात झाली होती, मात्र त्याच वेळी मध्यवर्ती भाग ते केडगाव उपनगर दरम्यान पाऊस नव्हता. जोरदार वा-याने शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तासाभरानंतर वा-याचा वेग मंदावला.
तत्पूर्वी दुपारी प्रचंड उकाडा होता. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात उकाडा कमालीचा वाढला आहे. बुधवारी सायंकाळी सलग दुस-या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सायंकाळी आठच्या सुमारास मोठय़ा पावसाला सुरुवात झाली. तो सुमारे अर्धा तास कोसळत होता. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत भुरभुर सुरूच होती. मंगळवारीही शहरात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता.
शहराला पुन्हा वादळाचा तडाखा
शहराला आज, गुरुवारी सायंकाळी पुन्हा जोरदार वादळाने तडाखा दिला. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले, मात्र कोणतीही मोठी हानी झालेली नाही. सुमारे तासभर सुरू असलेल्या वादळी वा-याने शहरात चांगलीच घबराट उडवून दिली.
First published on: 06-06-2014 at 03:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain with storm in city