सांगली : जिल्ह्यात पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावत जिल्ह्यात चार ठिकाणी अतिवृष्टी नोंदवली. गेल्या २४ तासांत चरण ता. शिराळा येथे ११३.३ मिलीमीटर पाउस झाला असून सरासरी ३३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने सांगली बंधारा ओसंडून वाहत असून दसर्या पर्यंत कोरडी राहणारी दुष्काळी भागातील अग्रणी नदी वाहती झाली आहे. पावसामुळे २० हून अधिक जिल्हा मार्ग, पाणंद रस्ते बंद झाले आहेत.
शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात दमदार पाउस सुरू झाला होता. रात्रभर काही ठिकाणी मध्यम ते हलयया सरी वारंवार पडत होत्या. या भीज पावसाने रानात फूट-दोन फूट पाणी साचले असून ओढे नाले दुथडी भरू न वाहू लागल्याने पाणंद रस्ते, गावओढ्यावर पाणी आल्याने मार्ग बंद झाले. मिरज मालगाव हा मिरज ओढा आल्याने वाहतुकीस आज बंद ठेवण्यात आला होता, तर नावरसवाडी पूलावर पाणी आल्याने सांगली नांद्रे आणि काकडवाडी फरशी ओढ्यावर पाणी आल्याने मिरज तासगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला.
मृग नक्षत्राच्या प्रारंभी प्रामुख्याने पश्चिम भागातील शिराळा तालुययात जोरदार पावसाचा सुरूवात होते. मात्र, यंदाच्या हंगामात हा पायंडा बदलला असून आटपाडी तालुययात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. दिघंची ओढा गेल्या २० वर्षानंतर प्रथमच दुथडी भरून वाहू लागला, यामुळे दिघंची आटपाडी हा मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कवलापूर ९७.३, कासेगाव ७८ चरण ११३.३ आणि आटपाडी ९१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही अतिवृष्टी आहे. जत, पलूस तालुके वगळता अन्य ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. तालुकानिहाय गेल्या २४ तासांत झालेला पाउस असा मिरज ३१.९, जत ०.७, खानापूर २९.४, वाळवा ४८.४, तासगाव २३.६, शिराळा ५८.२, आटपाडी ६७.३, कवठेमहांकाळ ३२.५, पलूस ७.५ आणि कडेगाव ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पश्चिम घाटात पाउस सुरू झाला असून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे ४१ तर नवजा येथे ५६ मिलीमीटर पाउस झाला. रविवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणात १५.२६ तर चांदोली धरणात १०.३८ं टीएमसी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले आहे