रायगड जिल्ह्य़ात गेले दोन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून उघडीप घेतली, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्य़ाच्या सर्वच भागात पावसाचा जोर ओसरला असून अलिबागमध्ये सकाळी सूर्यदर्शन झाले. अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मात्र रविवारी सकाळपासूनच जिल्ह्य़ात कुठेही पावसाच्या मोठय़ा सरी कोसळल्याचे वृत्त नाही.

सलग चार दिवस रायगड जिलत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला होता. सुदैवाने शनिवारी सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरायला सुरूवात झाली. रात्री पावसाने बरयापकी विश्रांती घेतल्यामुळे सखल भागात निर्माण झालेली तलावसदृश परिस्थिती आटोक्यात राहिली. सकाळपर्यंत पाणी पूर्णपणे ओसरले होते. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. रविवारी सकाळपासून काही ठिकाणी रिपरिपवगळता पावसाने बऱ्यापकी सुट्टीच घेतली. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. अलिबाग शहरातील युनियन बँकेच्या समोरचे झाड रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळले. यात कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही . समोरच्या इमारतीचे किरकोळ नुकसान झाले. कालच्या पावसाने नदीनाले तुडुंब भरून वाहायला सुरुवात झाली आहे. अंबा, कुंडलिका, भोगावती, सावित्री, काळ, उल्हास, गाढी, पाताळगंगा या नद्यांची पाणी पातळी चांगलीच वढली आहे. मात्र त्यांनी अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नाही. रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्य़ात सरासरी ११६ मिलिमीटर पाऊस पडला. अलिबागमध्ये तालुक्यात सर्वाधिक १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अजयच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत

शनिवारी रात्री रायगड किल्ल्यावरून पायी परतत असताना अंगावर दगड पडून अजयसिंग प्रताप शिखरावर या युवकाचा मृत्यू झाला. ग्वाल्हेरचा अजय सध्या पुण्यात आयटी इंजिनीयर म्हणून काम करत होता. तो मित्रांसह किल्ले रायगडावर फिरायला आला होता. अजयच्या नातेवाइकांना नसíगक आपत्तीअंतर्गत ४ लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिले आहेत.