सातारा- महाबळेश्वर, पाचगणी, वाई,कास जावळीत पावसाची संततधार सुरु आहे.महाबळेश्वर येथील पावसाने या हंगामातील १०० इंचाचा टप्पा आज पार करत १०६ .५९४ इंच पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप मात्र सुरू आहे. काही भागात पावसाने अद्यापही जोर पकडलेला नाही. महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा लेक भरून वहात आहे.महाबळेश्वरचे आकर्षण लिंगमळा धबधबा आणि येथील पावसाळी वातावरण,दाट धुके निसर्गाने पर्यटकांना भुरळ पडली आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. मागील महिन्याभरापासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वर येथे शंभर इंच पाऊस झाला. १ जूनपासून कमी अधिक  पाऊस पाऊस आहे.  महाबळेश्वर येथे आज १४७ (एकूण २७०७) मिमी १०६.५९४ इंच पावसाची नोंद झाली.यावर्षी या हंगामातील एक महिण्यात (दि ३० जून पावसाने ५०.८०७ इंचाचा (१२९०.५० मिमी)टप्पा आज पार केला होता. या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णा तलाव भरून वाहत आहे. महाबळेश्वर येथे दाट धुके, थंड वातावरण अन् पावसाच्या सरी अंगावर झेलत पर्यटक वेण्णा लेक भरल्याने तलावात पर्यटक बोटींग करू लागले आहेत.संपूर्ण जून महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. जुलैच्या सुरवातीपासून पावसाने जोर धरल्याने महाबळेश्वर पाचगणी,सातारा तालुक्यातील व जावळी, वाईचा पश्चिम भाग,कास पठार परिसरातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णालेक तलाव पूर्णपणे भरल्याने पावसाळी हंगामात पर्यटक बोटींगचा आनंद घेऊ लागले आहे. शहरातील संततधार पावसामुळे शेतीच्या कामांनी वेग आला आहे. तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटनाची देखील वीकएंडला रेलचेल वाढली आहे. पर्यटक हे दाट धुकं, रिमझिम पाऊस व थंडीमध्ये देखील पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध लिंगमळा, केटस् पॉईंट अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. शहरातील अनेक  दुकानांमध्ये स्वेटर, ब्लॅकेट्स, जॅकेट, टी शर्ट अश्या वस्तूंचा सेल लावण्यात दुकानांमध्येही झुंबड उडत आहे.

significant drop in average rainfall in Igatpuri 748 mm recorded in Nashik so far
इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
Markandeshwar mountain, Devotees crowd,
नाशिक : मार्कंडेश्वर डोंगरावर बंदी झुगारुन भाविकांची गर्दी
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rain in Yavatmal many villages flooded and flood in Panganga river
यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर
Rainy weather, temperature, Pune Rainy weather,
पुणे : पावसाची उघडीप, उन्हाचा चटका; जाणून घ्या, विभागनिहाय तापमान
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग
Tadoba Tiger Safari and Tourism become Expensive
चंद्रपूर : पर्यटकांच्या खिशाला कात्री! ताडोबा व्याघ्र सफारी व पर्यटन महागले…

हेही वाचा >>>सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला; म्हणाले, “स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला…”

सातारा जिल्ह्यात दि.२२ जुलै रोजी सरासरी २६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ५१०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व नोंद मि.मी.कंसात एकूण पाऊस सातारा२६.७ (४४२.२), जावली-मेढा५८.४ (८०७.७), पाटण ४६.६ (७९१.८), कराड २५.४(४९४.६), कोरेगाव १७ (३६६.१) खटाव-वडूज ६.१ (३१७.१), माण- दहिवडी ३.७ (२५८.१), फलटण ३.१ (२८४.७), खंडाळा ६.२(१८९.३), वाई २४.४ (४२५.२), महाबळेश्वर १४७ (२७०७.५०) या प्रमाणे पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ८४.०१ अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व नोंद अब्ज घन फूटमध्ये आहेत.

धरणसाठ्याची टक्केवारी

मोठे प्रकल्प –कोयना ५९.४२ (५९.३५), धोम ४.८२ (४१.२३), धोम – बलकवडी १.९१ (४८.२३), कण्हेर  ५.६० (५८.३९), उरमोडी ३.७९ (३९.२७), तारळी ३.४१ (५८.३९).या प्रमाणे पाणीसाठा आहे.

(संततधार पावसामुळे महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात असे अनेक छोटेमोठे धबधबे वाहत आहेत.)