सावंतवाडी : गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असून रात्री उशिरापर्यंत मार्ग मोकळा होईल असे रेल्वेच्या कोकण जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेडणे गोवा मालपे या ठिकाणी पूर्वी एकदा असाच प्रकार घडला होता. आता रूळावर खालून पाणी येत आहे.सध्यस्थीतीत गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या आहेत तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे कडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून टनेल मध्ये सध्या रेल्वेचे इंजिनिअर गेले असून ते युध्दपातळीवर रेल्वे मार्ग मोकळा होईल असे प्रयत्न केला जात आहे. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आणि अभियंता मालपे गोवा येथे उपस्थित आहेत.

हेही वाचा…विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून संजय शिरसाटांचा नार्वेकरांना इशारा; म्हणाले, “लक्ष ठेवा, अन्यथा…”

दरम्यान कोकण जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई म्हणाले, रेल्वे प्रवासी वाहतूक लवकरच सुरू करण्यासाठी कोकण रेल्वेचे अभियंता प्रयत्न करत आहेत. तसेच कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आहेत.

कोकण रेल्वेच्या मार्गावर पेडणे बोगद्या मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्याने पेडणे बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या अन्य मार्गावर फिरवण्यात आल्या आहेत.रेल्वे बाबत माहिती मिळावी या प्रवाशांच्या सुविधेकरिता खालील फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीएसएनएल क्रमांक ०८३२-२७०६४८०. – सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains disrupt konkan railway line efforts underway to clear water and mud in malpe tunnel goa psg