रत्नागिरी : जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसामुळे पाणी प्रश्न सुटून जिल्ह्यातील अनेक धरणे तुडूंब वहात आहेत. १ जून ते १६ जुलै पर्यत १४५६७.५० मिलीमीटर सरासरी एवढा पाऊस पडल्याने तीन मध्यम आणि पाससष्ठ लघू पाटबंधारे प्रकल्पात ८० टक्के पाणी साठा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पा बरोबर बत्तीस लघू पाणी प्रकल्पामध्ये मुबलक पाणी साठा तयार झाला आहे. जिल्ह्यातील सात प्रकल्पामध्ये ९९ टक्के तर सोळा धरणातून ७५ टक्के आणि तेरा धरणे ५० टक्के पाणी साठ्याने भरली आहेत. खेड तालुक्यातील नातुवाडी, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी आणि राजापूर तालुक्यात अर्जुना असे तीन मधम पाणी प्रकल्प असून जलसंधारण आणि पाटबंधारे विभागाचे मिळून ६८ पाणी प्रकल्प जिल्ह्यात आहेत. त्यातील अर्जुनासह एकूण ३२ पाणी प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा करण्यात येतो. तसेच नऊ प्रकल्पात फक्त ५० टक्केच पाणी साठविले जाते.

हेही वाचा…“बारामतीच्या भाषणात माझं प्रचंड कौतुक…”, शरद पवारांचा छगन भुजबळांना खोचक टोला

जिल्ह्यातील गडनदीमध्ये ८०टक्के आणि नातुवाडी प्रकल्पात आतापर्यंत ६८ टक्केच पाणी साठा तयार झाला आहे. तर पडलेल्या मुसधार पावसामुळे शेल्डी, गुहागर, कुरवळ, अर्जुना, चिंचाळी,पंचनदी, शिरवली, चिडे, सोंडेघर,फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवने, आंबतखोल, मोरडे, कडवई, रांगव, शिळ, व्हेल, गवाने, बेणी, मुचकंदी, हर्दखळे, इंदवटी, कोंडगे, बारेवाडी आणि वाटुळ या प्रकल्पांमधून पाणी ओसंडून वहात आहे. जिल्ह्यातील या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा तयार झाल्याने एप्रिल- मे महिन्यात येणा-या पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची शकता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains solve water shortage in ratnagiri as dams overflow psg