कराड : पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना धरणक्षेत्रातील पावसाचा जोर आज शुक्रवारी सकाळपासून बऱ्यापैकी ओसरल्याने जलआवकही काहीशी घटली आहे. परिणामी धरणाच्या सांडव्यावरून आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता करण्यात येणारा प्रतिसेकंद १० हजार घनफूट पाण्याचा विसर्ग रद्द करण्यात आला आहे. अशातच कृष्णा- कोयना नद्यांकाठीही पाऊस मंदावल्याने सांगली, कोल्हापूरची पूरस्थिती निवळण्यास मदत होणार आहे.

धरणक्षेत्रात नाममात्र पाऊस

आज सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजेच साडेपाच तासात कोयना पाणलोटातील महाबळेश्वर येथे २४ मिलीमीटर, नवजाला ४ तर, धोम- बलकवडी धरणक्षेत्रात ५, उरमोडी ४, कुंभी १, दुधगंगा ८, मोरणा ४, नागेवाडी २ मिलीमीटर असा धरणक्षेत्रातील नाममात्र पाऊस आहे.

Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट
Pushpak Train, Jalgaon Pushpak Train ,
जळगावपूर्वी असा भीषण रेल्वे अपघात कुठे झाला होता ? हावडा एक्स्प्रेसने चिरडले होते…
Loksatta Chatura Nature Change of seasons and moments of joy in the garden
निसर्गलिपी: ऋतू बदल आणि बागेतील आनंदाचे क्षण
Cold has increased and Nagpur recorded the lowest temperature
राज्यात गारठा वाढणार, नागपूर १० अंश सेल्सिअसवर..

हेही वाचा…Manoj Jarange : “ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका..”, मनोज जरांगेंचं वक्तव्य

सांगली, कोल्हापूरचा पुराचा विळखा सैलावणार

पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधारेमुळे कोयनेसह अनेक धरणातील जल आवक झेपावली. आणि कोयना, वारणा-चांदोली, कण्हेर, उरमोडी, धोम, वीर आदी जलाशयांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता. परिणामी सततचा पाऊस आणि धरणांमधील जलविसर्ग या मुळे पूर, महापूराचे आस्मानी संकट उभे ठाकले. परंतु, सलग कोसळणारा आणि गेल्या चार दिवसात चांगलाच जोर धरलेला पाऊस आज शुक्रवारी सकाळपासून ओसरल्याने कोयनेपाठोपाठ सर्व जलशयातून विसर्ग वाढण्याची चिंता तुर्तास तरी दूर झाली असून, विसर्ग वाढण्या ऐवजी सध्या तो कमी होत असल्याने सांगली, कोल्हापूरचा पुराचा विळखा सैलावणार आहे.

प्रशासन लागले कामाला

कोयना धरणातून आणखी विसर्ग वाढला जाणार असल्याच्या कालच्या सुचानांवरून खबरदारी म्हणून कंबर कसून प्रशासन कामाला लागले आहे. पाटण व सातारा तालुक्यातील १६७ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, महाबळेश्वर व पाटण तालुक्यात ४० जणांची पडझड झाली आहे. जे रस्ते, पुल बंद करण्यात आले आहेत तिथे जबाबदार अधिकारी वा कर्मचाऱ्यांसह पोलीस तैनात आहेत. सर्वच विभागांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या असून, प्रशासन सतर्क, कृतिशील दिसते आहे.

हेही वाचा…“’बिनशर्ट’ पाठिंबा देण्याऱ्यांनी एक महिन्यात भूमिका बदलली”, राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून संजय राऊतांची खोचक टीका!

कोयनेतून ३० हजार घनफुटच विसर्ग

पावसाचा अंदाज घेवून कोयना धरणाचे सहा विक्री दरवाजे टप्प्याटप्प्याने उचलून ३० हजार क्युसेकने जलविसर्ग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत त्यात १० ते २० हजार क्युसेकने वाढ होण्याची शक्यता होती. परंतु मुसळधार ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक अल्पशी घटून ती ७० हजार ४८७ क्यूसेक्सच्या जवळपास पोहचली आहे. त्यामुळे धरण परिचलन सूची आणि पावसाचा जोर तसेच पावसाळ्याचा उर्वरित कालावधी गांभीर्याने घेऊन धरणाच्या सांडव्यावरील ३० हजार क्युसेकचा जलविसर्ग आज शुक्रवारी दुपारी १२ वाजलेपासून ४० हजार क्युसेक आणि सायंकाळी तो आणखी वाढवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने मागे घेतला आहे. गरजेनुसार जलविसर्गात वाढ होण्या ऐवजी आता तो स्थिर राहण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे सांगली कोल्हापूरचे महापुराचे संकट दूर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कोयनेचा जलसाठा ८२ अब्ज घनफूट

सध्या कोयना धरणात सुमारे ८२ अब्ज घनफूट (७८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. तसेच धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाणी कोयना नदीत मिसळत आहे. यामुळे पायथा वीजगृहासह सांडाव्यावरील मिळून असा ३२,१०० क्युसेकचा कोयना नदीपात्रात जलविसर्ग राहणार आहे. त्यामुळे कृष्णा कोयना नदी पात्रातील पाण्यात पाण्याची पातळी स्थिर राहील किंवा हळूहळू कमी होईल असेच सध्याचे चित्र आहे.

हेही वाचा…Video : अलिबाग समुद्रात बार्ज भरकटले, खलाशांची तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरने केली सूटका

१६७ कुटुंबांचे स्थलांतर

सातारा तालुक्यातील मोरेवाडी व भैरवगड. पाटण तालुक्यातील जोतिबाची वाडी व मारवन. या चार गावातील १६७ कुटुंबातील ५१४ जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. याचबरोबर पाटण व सातारा तालुक्यातील ४० घरांची पडझड झाली आहे. काल गुरुवारी मध्यरात्री पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे व तहसीलदार अनंत गुरव यांनी सन २०२१ मध्ये भूस्खलन झालेल्या मिरगावची पाहणी केली. लोकांनी आपण जिथे आहोत तिथे सुरक्षेचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी थांबावे. ज्या लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांनी आपले ठिकाण सोडू नये. असुरक्षित स्थळी येणे – जाणे वा वास्तव्य करू नये असे आवाहन प्रशासनाने केली आहे.

Story img Loader