जिल्ह्यातील काही गावांत मृग नक्षत्रापूर्वी पडलेल्या पावसावर विसंबून खरीप पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके नंतर मात्र पावसाने दडी मारल्याने वाळून गेली व त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. या शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेने निवेदनाद्वारे केली.
जि.प.चे उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना शिवसेनेतर्फे याबाबत निवेदन देण्यात आले. जून महिना कोरडाच गेला. परंतु जुलै सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. संभाव्य दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
िहगोली तालुक्यातील आंबाळा, आडगाव, बोंडाळा, िभगी, वांझोळा, देवठाणा, कानरखेडा, फाळेगाव, एकांबा, माळहिवरा, तलबुर्गा, मोप, िपपरी, कनेरगाव नाका, खंडाळा आदी गावांत शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या एक दिवस आधी झालेल्या पावसावर विसंबून पेरणी केली होती. परंतु नंतर पावसाने ताण दिल्याने ही सर्व पिके वाळून गेली. आता या गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांना खते, बियाणे घेण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर गायकवाड, किशनराव गावंडे, बालकिशन आगलावे, रामप्रसाद वसू, पंढरी नारायण आदींच्या सहय़ा आहेत.

Story img Loader