गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या रब्बी पिके, तसेच फळबाग शेतक ऱ्यांनाच राज्य सरकारच्या पीककर्ज संदर्भातील मदतीचा लाभ मिळणार आहे! सरकारची ही मदत योजना २०१३-१४ मधील खरिपासाठी व रब्बीत ज्यांचे नुकसान झाले नाही, त्या शेतक ऱ्यांना लागू असणार नाही. राज्य सरकारने या संदर्भात तीन महिन्यांपूर्वी घेतलेला निर्णय व सहकार विभागाने काढलेल्या परिपत्रकासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आता हे स्पष्टीकरण केले आहे.
फेब्रुवारी व मार्चमध्ये गारपीट व अवेळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झालेल्या शेतक ऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या २० मार्चला निर्णय जाहीर केला होता. याच अनुषंगाने सहकार विभागानेही २६ मार्चला परिपत्रक काढले होते. आता जालना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी या संदर्भात काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. गेल्या २० मार्चच्या शासन निर्णयात म्हटले होते, की गारपिटीने बाधित शेतक ऱ्यांकडून बँकांनी येत्या डिसेंबपर्यंत सक्तीने कर्जवसुली करू नये. तोपर्यंत पीककर्ज परतफेडीस मुदतवाढ द्यावी. २०१३-१४ साठी बाधित शेतक ऱ्यांच्या पीककर्जाचे व्याज राज्य सरकार भरेल व त्यांच्या पीककर्जाचे तीन वर्षांसाठी (२०१६-१७पर्यंत) पुनर्गठन करण्यात येईल, असेही या निर्णयात म्हटले होते.
सन २०१३-१४ मध्ये खरीप हंगामासाठी कर्ज घेतलेल्या शेतक ऱ्यांना व्याजमाफी योजना लागू असणार नाही. रब्बी हंगामासाठी ज्या शेतक ऱ्यांनी पीककर्ज घेतले असेल व ज्यांचे गारपिटीने नुकसान झाले आहे, असेच शेतकरी व्याजमाफीच्या योजनेस पात्र राहणार आहेत. त्यांच्याच पीककर्जाचे व्याज राज्य सरकार भरणार आहे. फळपिकांसंदर्भात हा अपवाद असू शकेल. कारण खरिपात फळपिकांसाठी कर्ज घेतल्यावर त्याचे रब्बीमध्ये गारपिटीने नुकसान झाले असेल, तर त्यास व्याजमाफी मिळू शकेल.
सन २०१३-१४ च्या रब्बी हंगामात जालना जिल्ह्य़ात १ अब्ज ४४ कोटींचे पीककर्ज वाटप झाले होते. १९ हजार ८८१ शेतक ऱ्यांनी हे कर्ज घेतले. पैकी ज्या शेतक ऱ्यांची पिके बाधित झाली त्यांनाच सरकारच्या पीककर्ज माफीचा व पीककर्ज पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे.
केवळ खरिपासाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतक ऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपूर्वी पीककर्जाची परतफेड केलेली असणे आवश्यक असणार आहे. तसेच ३० जानेवारीला दोन वर्षे होणारी कृषी कर्जे तोपर्यंत परतफेड न झाल्यास ‘अनुत्पादक जिंदगी’त समाविष्ट केली जाणार आहेत. गेल्या रब्बीत गारपीट व अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या लाभासाठी सहकार विभागाने २० मार्चच्या परिपत्रकात नमूद केलेल्या पर्यायांपैकी एकाची निवड करून संबंधित बँकेस सादर करायचा आहे. येत्या ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढीचा लाभ घेणाऱ्या गारपीटग्रस्त शेतक ऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज योजनेचा लाभ मिळू शकेल. तीन वर्षांसाठी पीककर्ज पुनर्गठन होणारे बाधित शेतकरी २०१४-१५ मध्ये पीककर्जासाठी पात्र ठरणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा