काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘हेरा फेरी’च्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. आता अखेर आज या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहे. मात्र तरीदेखील चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मध्यंतरी या चित्रपटाबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला अक्षय कुमारने नकार दिल्यामुळे त्याची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण अखेर अक्षयचं हा चित्रपट करत आहे. मात्र चाहते नाराज आहेत ते चित्रपटाच्या दिग्दर्शकावरून, पहिल्या भागाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते तर दुसऱ्या भागाचे नीरज व्होरा यांनी आता टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन फरहाद सामजी हे करणार आहेत. त्यांनी याआधी ‘हाऊसफुल्ल ४’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘हेरा फेरी ३’ च्या सेटवरचा फोटो व्हायरल; बाबुराव, श्याम व राजूची पहिली झलक पाहिलीत का?
फराहद सामजी हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी योग्य नाहीत यावरून चित्रपटाच्या चाहत्यांनी निषेध व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. change.org या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांनी एक याचिका तयार केली आहे ज्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की “हेरा फेरीसारख्या फ्रँचायझीचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी करू नये. त्यांचे मागील चित्रपट बघता ते फारसे समाधानकारक नाहीत त्यामुळे हेराफेरीच्या दिग्दर्शनात बदल करण्यात यावा.” असे लिहण्यात आले आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला आहे. या चित्रपटात परेश रावल, सुनील शेट्टी यांच्याबरोबर राजूच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसेल असं समोर आलं आहे.

- 1/
farahad samaji