Petrol-Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधीत दिलासा मिळालेला नाही. काही शहरात अगदी किंचित दरवाढ तर घसरण पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी मात्र दर स्थिरचं दिसून आले. दरम्यान आज १६ जूनचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल पाहायला मिळाला आहे. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. तर जाणून घेऊ या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील मोठा बदल…
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०५.५६ | ९१.०८ |
अकोला | १०४.२८ | ९०.८४ |
अमरावती | १०५.३६ | ९१.८७ |
औरंगाबाद | १०५.३४ | ९०.८६ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८८ | ९२.३५ |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.४१ |
चंद्रपूर | १०४.०४ | ९०.६१ |
धुळे | १०४.७० | ९१.२२ |
गडचिरोली | १०५.१८ | ९१.७१ |
गोंदिया | १०५.४७ | ९१.९८ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०४.२५ | ९०.७९ |
जालना | १०५.८३ | ९२.२९ |
कोल्हापूर | १०५.३६ | ९१.८७ |
लातूर | १०५.१६ | ९१.६७ |
मुंबई शहर | १०४.२१ | ९२.१५ |
नागपूर | १०३.९६ | ९०.५२ |
नांदेड | १०५.८१ | ९२.३१ |
नंदुरबार | १०४.९१ | ९१.४२ |
नाशिक | १०४.४३ | ९०.९५ |
उस्मानाबाद | १०४.८३ | ९१.३६ |
पालघर | १०४.३१ | ९०.८० |
परभणी | १०४.४१ | ९२.८६ |
पुणे | १०४.५३ | ९१.०४ |
रायगड | १०५.०३ | ९१.५० |
रत्नागिरी | १०५.५७ | ९२.०४ |
सांगली | १०४.४३ | ९०.५३ |
सातारा | १०४.६८ | ९१.२१ |
सिंधुदुर्ग | १०५.८९ | ९२.३८ |
सोलापूर | १०४.६९ | ९१.२२ |
ठाणे | १०४.२८ | ९२.२२ |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.८७ | ९१.४० |
यवतमाळ | १०५.३७ | ९१.८८ |
महाराष्ट्र्रातील अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, पालघर, ठाणे या शहरांत पेट्रोलच्या किमतीत किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे. तर जळगाव, नांदेड, नंदुरबार, परभणी, सांगली या शहरात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण येथे पेट्रोलच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच अहमदनगर, पुणे, धुळे, औरंगाबाद येथे डिझेलच्या किमतीत दरवाढ तर चंद्रपूर, जळगाव, नाशिक, परभणी या शहरांत डिझेलच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच काही शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कोणताही बदल झालेला दिसत नाही आहे.
तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करत असतात.
देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.
पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.तर आज रविवार सुट्टीच्या दिवशी अनेक जण कुटुंबातील सदस्यांबरोबर फिरायला जातील. तर यापूर्वी तुमच्या शहरांत आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? दुचाकी किंवा चारचाकीसाठी आज तुमच्या शहरात १ लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे एकदा नक्की पाहून घ्या आणि तुमच्या गाडीची टाकी फूल करून घ्या.