सांगली : विमान उतरण्याची पाच ठिकाणी सुविधा असलेला नवी मुंबई ते बंगळूरू महामार्ग बांधण्याचे ठरविण्यात आले असून, या मार्गाने ८०० किलोमीटर अंतर आठ तासांत पार करता येईल , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राष्ट्रीय महामार्गावरील दहिवडी – मायणी – विटा या रस्त्याचे काँक्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जोन्नतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विटा येथे शुक्रवारी करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते.

Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन निश्चित
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Bhaskar Bhopi Marg which connects two tourist spots of Madh and Marve will be widened
मढ मार्वे रस्ता चौपट रुंद होणार, भास्कर भोपी मार्गाचे महापालिका करणार रुंदीकरण
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
pune Municipal Corporation plans to open Pimpri flyover by March
पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?

हेही वाचा >>>प्रतापगडाच्या संवर्धनाचे ‘युनेस्को’कडून कौतुक

गडकरी म्हणाले, की या नवीन मुंबई पुणे – बंगळुरू द्रुतगती मार्गाची लांबी ८०० किलोमीटर असणार आहे. सहापदरी असणाऱ्या या महामार्गावर पाच ठिकाणी मार्गावरच मालवाहू विमान उतरण्याची सोय म्हणजेच धावपट्टी बांधण्यात येणार आहे. याद्वारे वाहतूक जलद होऊन त्यावरील खर्चातही बचत होईल. या नव्या मार्गाने नवी मुंबई ते बंगळूरू हे अंतर केवळ आठ तासांत पार करता येईल, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी ७४ किलोमीटर आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल. आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू, म्हैसाळ योजनाना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचे सांगून या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होऊन हिरवं शिवार फुलल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

दहिवडी मायणी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास ६०० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. सांगली तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे भूसंपादन सुरू झाले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.

Story img Loader