सोलापूर : आपल्या देशातील सभ्यता, संस्कृती, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा जाणीवपूर्वक नष्ट केला जात आहे. शाळा -महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी यातूनच घातली जाते, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या वैचारिक पाया सोडून दिल्याची टीका आझमी यांनी या वेळी केली. सोलापुरात शनिवारी आमदार आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजप व संघ परिवारावर जोरदार टीकास्त्र सोडले.   भाजप व संघ परिवाराने हिंदुत्ववादाच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण चालविले असताना दुसरीकडे बहुसंख्य हिंदु तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले जात आहे. चुकीच्या आणि आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader