सांगली : औरंगजेबाचे थडगे उखडून समुद्रात फेका आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा, अशी आग्रही मागणी मंगळवारी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, अमेरिकेने इस्लामिक दहशतवादी ओसामाबीन लादेनचे पार्थिव जसे समुद्रात फेकून दिले तसेच औरंगजेबाचे थडगे राज्यातले सरकारने उखडून समुद्रामध्ये फेकून द्यावे, थडग्यावर लावलेला हजरत औरंगजेब नावाचा फलक ताबडतोब हटवावा. औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी भाजप महिला सरचिटणीस स्वाती शिंदे, पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, अविनाश मोहिते, मनोज साळुंखे यांची भाषणे झाली. आंदोलनात सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, दत्ता भोकरे, प्रकाश भोसले, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, कृष्णा नायडू, सुजित पाटील, गणेश सगरे, प्रीती काळे, गंगा नाईक आदी उपस्थित होते.