मीरत आणि पंजाबमध्ये लष्करी अधिकारी आणि जवान यांच्यात झालेल्या हाणामारीच्या घटनांनी लष्करातील बेशिस्ती चव्हाटय़ावर आणली असतानाच संरक्षण दलातील बेशिस्तीचा नमुना समोर आला आहे. देशाच्या हवाई युद्धसज्जतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘सुखोई एमकेआय ३०’ या अत्याधुनिक लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखान्यातील कामकाज मंगळवारी कामगार संघटना आणि अधिकारी वर्ग यांच्यातील वादामुळे ठप्प झाले आहे. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार करत अधिकारीवर्गाने कामावर बहिष्कार टाकला. तर अधिकारी कामावर येत नाही, तोवर काम न करण्याचा इशारा कामगारांनी दिल्याने ‘सुखोई’ निर्मितीचे काम पूर्णपणे थंडावले आहे.
विमानाचे बाह्यावरण तयार होणाऱ्या कक्षातील अधिकारी कामगारांना त्रास देत असल्याच्या मुद्दय़ावरून वादास सुरुवात झाली. या वेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याने केली. त्यानंतर ‘एचएएल ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन’ या अधिकाऱ्यांच्या संघटनेने कामावर बहिष्कार टाकून संबंधित कामगारावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे मंगळवारी विमानांच्या बांधणी प्रक्रियेतील एकही काम होऊ शकले नाही.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी मध्यस्थी करून या मुद्दय़ावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यास दाद दिली नाही. अधिकारीवर्गाने आंदोलन सुरू ठेवल्यास कामगार संघटनेने वेगळा पवित्रा स्वीकारण्याचा इशारा दिल्याने हा वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. अधिकारी संघटनेने बंगळुरूच्या मुख्यालयात दाद मागितली आहे.
‘सुखोई’ निर्मितीला फटका
हवाई दलाशी झालेल्या करारानुसार प्रथम १४० आणि नंतर ४० अशा एकूण १८० सुखोई विमानांची बांधणी एचएएलला करावयाची आहे. एचएएलने सुखोई बांधणीचा कार्यक्रम २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. गतवर्षीपर्यंत १२० हून अधिक विमाने हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आली. उर्वरित विमाने शक्य तितक्या लवकर देण्याचा एचएएलचा प्रयत्न आहे. परंतु, यात आता अडथळा निर्माण झाला आहे.
अधिकारी व जवान यांच्यात वाद झाल्याच्या घटनांनी लष्करातील बेशिस्ती समोर आणली आहे. त्यातील काही ठळक घटना..
* जून, २०११ : पंजाबमधील गुरुदासपूर येथील तिबरी कॅन्टोनमेंट येथे अधिकारी व जवान यांच्यात हाणामारी.  बंडसदृश परिस्थिती. दोन अधिकारी व १६ जवानांचे कोर्ट मार्शल झाले.
* मे, २०१२ : लष्कराच्या न्योमा या तळावर दोन गटांत हाणामारी. एका अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याच्या घटनेवरून अधिकारी व जवान यांच्यात तणाव निर्माण झाला.
* ऑगस्ट, २०१२ : साम्बा क्षेत्रात उखळी तोफांच्या पथकातील अधिकारी व जवान यांच्यात वाद. त्याचे पर्यवसान परस्परांवर हल्ला करण्यात झाले. उच्चाधिकाऱ्यांनी मध्यस्थी पडून तंटा मिटवला.

dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
Five pistols seized from hotel worker in Shirur Pune print news
 शिरुरमध्ये हाॅटेल कामगाराकडून पाच पिस्तूल जप्त
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Air Strike in hijbullah
Israeli Air Strike : इस्रायलचा हेजबोलाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला, दहशतवादी हसन नसराल्लाह ठार?