RPF Jawan Shoot: जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर आरोपी जवानाची एक चित्रफीत वायरल झाली त्याबाबतही रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

व्हायरल व्हिडिओत जवान काय म्हणताना दिसतो आहे?

या जवानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात जवान “अगर वोट देना है, हिंदुस्थान मे रहना है तो मोदी और योगी, ये दो, और आपके ठाकरे” असं म्हणताना दिसतो आहे. या व्हायरल क्लिपच्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. तपासाअंती यातलं सत्य बाहेर येणार आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : निकालाच्या काही तास आधी राजकीय हालचालींना वेग; महायुती अन् ‘मविआ’कडून ‘प्रहार’शी संपर्क, बच्चू कडूंची भूमिका काय?
no alt text set
Vinod Tawde : “जाहीर माफी मागा, अन्यथा…”; राहुल…
Sharad Pawar News
Narayan Rane : विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार महायुतीशी हात मिळवणार? भाजपा खासदाराचा दावा काय?
Uddhav Thackeray On Gautam Adani
Uddhav Thackeray : “…तर मोठा स्फोट झाला असता”, गौतम अदाणी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Eknath Shinde Guwahati tour
Sanjay Shirsat on Guwahati: “यावेळी उटी, गुवाहाटी जाणार नाही तर जिवाची..”, शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले सत्तास्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results in Marathi
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
Chhagan Bhujbal on Eknath Shinde and Sharad Pawar
एकनाथ शिंदे खरंच शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याच्या दाव्यावर छगन भुजबळांचा टोला
no alt text set
Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार? पुण्यात लागलेल्या पोस्टरमुळे महायुतीमधील चढाओढ चर्चेत

हे पण वाचा- Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंहने गोळीबार का केला? लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणाले…

हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला?

या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना, अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला, अख्तर अब्बास अली यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी जवान चेतन सिंह याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत चेतन सिंहने टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. त्या डब्यात आणखी एका प्रवाशाची हत्या केल्यानंतर त्याने पॅन्ट्री डब्यात एकाचा गोळी मारली. त्यानंतर पुढील डब्यामध्ये आरोपीने एकाची हत्या केली. त्यानंतर मिरा रोड स्थानकावर उतरल्यानंतर आरोपी स्थानकावर उतरून रूळांवरून पळू लागला. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आरोपी धार्मिक विधाने करत असताना दिसून येत आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांना प्रश्न विचारले असता तपास प्राथमिक स्तरावरून असून आम्ही सर्व बाजूंनी याप्रकरणी तपास करत असल्याचे सांगितले.

हे पण वाचा- VIDEO : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? एसी कोच अटेंडंटने सांगितला थरारक प्रसंग; म्हणाले, “जवान…”

पश्चिम रेल्वेचे पोलीस आयुक्त पी.सी. सिन्हा काय म्हणाले?

“चेतनचा स्वतःवरचा ताबा सुटला, त्यातून त्याने हे कृत्य केलं. ASI टीकाराम आणि आरोपी चेतन या दोघांमध्ये काहीही वैमनस्य नव्हतं. आम्ही आता त्याची चौकशी करतो आहोत.”

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी काय म्हणाले?

या घटनेबाबत विचारलं असता, पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, “त्याने चेन ओढली आणि दहीसर तसंच मीरारोड या स्थानकांच्या मधे उतरला. त्याला भाईंदरच्या RPF टीमने अटक केली आहे. त्याची या प्रकरणात चौकशी सुरु आहे.” ही माहिती दिली आहे.